II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-चित्रपट गीत क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 12:27:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                       चित्रपट गीत क्रमांक-10
                                 ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. आजचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त मराठी चित्रपटातील काही प्रेम-गीते.

     'Sar Sukhachi Shravani', this pleasant romantic track from 'Mangalashtak Once More' will surely delight you with its music. It features Swapnil Joshi and Mukta Barve. The song picturises the emotional roller coaster the lead pair go through after the initial days of their marriage. Sung by Bela Shende and Abhijeet Sawant, this song is another amazing song that features Swapnil Joshi.

     Sar Sukhachi Shravani Lyrics – Mangalashtak Once More ( सर सुखाची श्रावणी Sar Sukhachi Shravani Lyrics In Marathi ) This Song Is beautifully Sung By Abhijeet Sawant & Bela Shende. And Composed By Nilesh Moharir While Sar Sukhachi Shravani Song Written By Guru Thakur. The Song Is From Sameer Joshi's (Mangalashtak Once More) Starring Mukta Barve & Swapnil Joshi.


                                 सर सुखाची श्रावणी


हं... हं...
हं... थांब ना...
हं... हं...
तू कळू दे, थांब ना...
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना

हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

खेळ हा तर कालचा...
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा...
कालचा हा खेळ बघ वाटे नवा
बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे

वाटतो आता...
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा...
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा...
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

=====================
मराठी चित्रपट : मंगलाष्टक  वन्स  मोर
संगीतकार : निलेश  मोहरीर
गायक : अभिजीत सावंत आणि बेला शेंडे
गीतकार : गुरु  ठाकूर
कास्ट : मुक्ता  बर्वे आणि स्वप्नील  जोशी
डायरेक्टर : समीर  जोशी
=====================


                        (साभार आणि सौजन्य-सॉंग लैरिसिस्ट .कॉम)
                      (संदर्भ-टाइम्स ऑफ इंडिया.इंडिया टाइम्स.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.