सांज

Started by शिवाजी सांगळे, February 15, 2022, 08:29:36 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सांज

मौनाचे अस्तर...पांघरते सांज
भाव मनातले ती जाणते सांज

चंद्र साक्षी विभ्रमी रंगा सोबत
गुज मनीचे मग पाझरते सांज

बोलू पाहती रंग गुढ आसमंती
मूकपणेच सावळी ऐकते सांज

सांगशील सारे तुझ्या मनातले
हळूच एक वचन मागते सांज

आवर्तने भोगल्या सुखदुःखांची
एकटीच हळवी आळवते सांज

गुंग, अबोल, मौन होता होता
हलकेच नेत्रात ओघळते सांज

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९