"शेतीचे रूपांतर सत्यनारायण करताहेत जंगलात,रहाताहेत पशु-पक्ष्यांच्या ते सहवासात"

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 01:50:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय  : तेलंगणा  येथे  ६७  वर्षांच्या  श्री .दुशेरला  सत्यनारायण  यांनी  आपल्या  ७०  एकर  जमिनीवर  (शेतात)जंगल  वसवलंय.
            शेतीचे  रूपांतर  जंगलात ,अनोखी  अभिनव  संकल्पना  चारोळ्या
"शेतीचे रूपांतर सत्यनारायण करताहेत जंगलात,रहाताहेत पशु-पक्ष्यांच्या ते सहवासात"
--------------------------------------------------------------------------


(1)
तेलंगणातील  "सत्यनारायण"  शेतीचे  रूपांतर  "जंगलात"  करताहेत
अभूतपूर्व ,अनोखी  अशी  ही  संकल्पना  ते  आज  स्वतःहून  राबवताहेत
ऐकले  होते  "जंगलतोड"  करून ,शेती  होत  होती , यापूर्वी  अनेकदा ,
पाहिलेय  आता  प्रथमच ,७०  एकर  शेतीला  "जंगलात"  परिवर्तित  होताना .

(2)
सलाम  माझा  या  "जंगल" -मित्राला ,"वन" -सख्याला ,निसर्ग -मित्राला
रात्रंदिन  खपून  त्यांनी  ही  "वनराई"  उगवलीय ,झाडे  लावलीय ,झाडे  जगवलीय
तळीही  राखून  त्यांनी , पशु -पक्षी ,इतर  जनावरांचीही उत्तम  सोय  केलीय ,
या  मूक  जीवांच्या  अन्नाचीही  या  जंगल -संवर्धनातून  त्यांनी  काळजी  वाहिलीय .

(3)
शेतकरी , हा  स्वतःसाठी  कधीच  जगत  नाही ,तो  परोपकारीच  असतो
हाच  भाव , मनोभाव  त्याच्या  या  कृतीतून  स्पष्टपणे  जाणवतो
मानव  जातीची  सर्वथा  काळजी  वाहता -वाहता  त्यांनी  "जंगल -वन"  उभारून ,
मानवतेसह ,भूत -दयेचाही  संकल्प  सोडल्याचा  भाव  मनोमन  जाणवतो .

(4)
"सत्यनारायणांना"  आहे  साथ  या  कार्यात  त्यांच्या  सवंगड्यांचीही
दिवस -रात्र  करून  मेहनत , घेताहेत  काळजी  ते  या  "वनराईची"
वृक्ष -मित्र , वृक्ष -प्रेमींच्या  डोळ्यांचे  पारणे  आज  फिटत  आहे ,
"दुशेरला  सत्यनारायणात" , आज  ते  जणू  आपला  आदर्श  पहात  आहेत .

(5)
शेतीचे  रूपांतर  "जंगलात"  करून  त्यांनी ,सर्वा  एक  नवा  संदेश  दिलाय
स्वतःपुरतेच  जगू  नका ,इतरांसाठीही  जागा ,त्यांनाही आपलेसे  करा
इतरत्र , हळूहळू  नष्ट  होत  जाणारी  "जंगले" , "वनराई"  त्यांनी  स्पष्टपणे  हेरलीय ,
स्वतःपासून  सुरुवात  करून, त्यांनी  ही "जंगल" -संवर्धनाची  अभिनव  कास  धरलीय .

(6)
प्रत्येकाचा  आहेत  ते  आदर्श , त्यांच्या  पाऊलावर  पाऊल  ठेऊन  चालावे
निसर्गाचा  समतोल  राखावा , वृक्षांवर  कुऱ्हाड  चालवायचे  थांबवावे
या  "जंगल" -मॅन ("वन" -मित्र ) ने  केलंय  हे  सारे  उभे , सर्वस्व  त्यागून ,अर्पून ,
जपूया  आपण  वारसा , त्यांनी  केलेल्या  या  महान  कार्याचा , अभिमान  बाळगून .


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.