II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:37:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           निबंध क्रमांक-4
                             ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                   छत्रपति शिवाजी महाराज निबंध---

     शिवाजी भोंसले, ज्यांना शिवाजी महाराज म्हणूनही ओळखले जाते, ते लोकांचे राजे मानले जात होते. त्याचा दृढनिश्चय, शौर्य आणि वर्चस्व हे अनुकरण करण्यासारखे प्रतीक होते. त्याच्या धाडसाला सीमा नव्हती.

     या लेखात विद्यार्थ्यांसाठी दीर्घ आणि लघु शिवाजी महाराज निबंध समाविष्ट आहेत. तुम्ही ऐतिहासिक तथ्यांचे अनुसरण करू शकता आणि स्वतः शिवाजी महाराजांवर निबंध लिहू शकता. परीक्षेत अधिक गुण मिळवण्यासाठी खालील फॉरमॅट फॉलो करा आणि योग्य क्रम राखा. या निबंधांचा उपयोग शिवाजी महाराज निबंध लेखन स्पर्धेच्या तयारीसाठीही करता येईल.

     फाल्गुन वद्य तीन शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० वार शुक्रवार रोजी सुर्यास्तानंतर शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला.

     त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी तर आईचे नाव जिजाऊ असे होते. निजामशाही वाचविण्याच्या प्रयत्नात मोगलपाठीवर असताना गरोदर असलेल्या जिजाऊ साहेबांना शहाजीराजांनी जुन्नरजवळील 'शिवनेरी किल्यावर ठेवले वे ते पुढे गेले.

     बाळ शिवबांच्या जडणघडणीत मासाहेब जिजाऊ याचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनीच बालपणी त्यांना वीर पुरुषांच्या, नैतीकतेच्या गोष्टी शिकवल्या.

     शिवाजी राजांची पहिली सहा वर्ष ही शिवनेरी, पेमगिरी व माहुली या किल्ल्यावर व्यतित झाली.

     स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. मित्रांची एक जबरदस्त फौज तयार केली. त्यांना आपण मावळे म्हणतो. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांनी तोराणागड जिंकून घेतला. त्यानंतर रायगड, प्रतापगड आदी किल्यांचा समावेश आहे. तर सिधुदूर्ग, जलदूर्ग, स्वर्णदुर्ग आदी किल्यांचे बांधकाम केले.

     लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा राजा अशी त्यांची जगात ओळख आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात आठ मंत्री होते. त्यांना अष्टप्रधान असे म्हणत.

     इतर धर्मीयांचा आदर बाळगणे, स्त्रीयांचा सन्मान करणे आणि गरिबांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्ये होते. म्हणूनच आजच्या लोकशाहीत देखील त्यांच्यासारख्या एका लोककल्याणकारी राजाची आठवण केली जाते.

     त्यांच्या सैन्यात अनेक जाती-धर्माची आणि जीवाला जीव देणारी माणसं होती. त्यांनी कधीही जातीवादाला थारा दिला नाही उलट अठरा पगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊनच शिवाजी राजांनी आपले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले.


--AUTHOR UNKNOWN
--------------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमी.कॉम)
                         ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.