II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:39:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          निबंध क्रमांक-5
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                 छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     शिवाजी महाराजांचा जन्म इ. स. १६२७ साली झाला, त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव व आई जिजाबाई या दोघांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले. अन्याय व जुलूम याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण केली. त्यांचा स्वाभिमान जोपासला. आपल्या धर्माबद्दल व राष्ट्राबद्दल त्यांच्यात प्रेम निर्माण केले. त्यांना पराक्रमाचे धडे दिले.

     शिवाजी महाराजांनी मराठ्यांना लढाईचे शिक्षण दिले व त्यांच्या मदतीने शत्रूचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते थोर मुत्सद्दी होते. कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्यांनी आपले कार्य पार पाडले. इ. स. १६७४ मध्ये रायगड येथे त्यांचा राज्याभिषेक मोठ्या थाटात साजरा झाला. हा थोर पुरुष १६८० मध्ये मृत्यू पावला.

     छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे राजे होऊन गेले. त्यांच्या पित्याचे नाव शहाजीराजे भोसले आणि मातेचे नाव जिजाबाई असे होते. शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीस होते. परंतु जिजाबाईंना मात्र वाटत होते की आपले स्वतंत्र राज्य असायला हवे. आपण दुस-याची चाकरी करता कामा नये. म्हणून त्यांनी लहानपणापासूनच शिवाजीला राम, कृष्ण आदि थोर, महान पुरूषांच्या कथा सांगितल्या.

     दादोजी कोंडदेव ह्या गुरूंनी शिवाजीला युद्धकलेचे, दांडपट्टा चालवण्याचे, तलवारबाजीचे आणि घोड्यावर बसण्याचे शिक्षण दिले. त्यांच्या मनात स्वराज्य हवे अशी स्वप्ने पेरली. म्हणूनच शिवाजीमहाराज स्वातंत्र्याच्या विचाराने पेटून उठले.

     मोठेपणी त्यांनी स्वतःचे राज्य उभारले. मोगलांना, आदिलशहाला, निजामाला पार सळो की पळो करून सोडले. मोगल बादशहा औरंगजेब ह्याला शेवटपर्यंत शिवाजीला पकडता आले नाही.

     त्यांनी १६७४ साली रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या राज्यात रायगड, सिंहगड, राजगड, प्रतापगड, सिंधूदुर्ग, पन्हाळा, राजमाची असे मोठमोठे किल्ले होते. शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्व खूप जाणलेले होते म्हणूनच ते जंजियाच्या सिद्दीशी लढू शकले.

     अशा ह्या शिवाजी महाराजांचे १९८० साली वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी निधन झाले.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमी.कॉम)
                         ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.