II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-लेख क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 04:45:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                              लेख क्रमांक-7
                                ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

     शिवजयंती 2022: छत्रपती शिवाजी जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2022 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.तिथी नुसार देखील  शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया (Falgun Vadya Tritiya) .यंदा ही फाल्गुन वद्य तृतीया 31 मार्च 2021 दिवशी आहे. त्यामुळे शिवभक्त तिथीनुसार यंदा 31 मार्च दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर  काही प्रसिद्ध शिवाजी महाराज सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्स,पोवाडे संग्रह ( chatrapati shivaji maharaj status marathi) इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता.शिवजयंती 19 फेब्रुवारी 2022 रोजी तारिखे नुसार तर 31 मार्च 2021 ला तिथी नुसार महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल.👍

                ⛳ छत्रपती शिवाजी महाराज थोडक्यात माहिती⛳

छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1630–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

     छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.

     मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भीस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                      ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.