II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:34:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                     चारोळी, कविता क्रमांक-3
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

                      श्री राजा शिवछञपती---

।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।
-छत्रपति शिवाजी महाराज..
=========================================

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."..........!!
=========================================

ना शिवशंकर... तो कैलाशपती,
ना लंबोदर... तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो...
।। राजा शिवछत्रपती ।।
=========================================

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
=======================================

आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल विचारायचे असेल तर

विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना
खणखनणार्या तलवारीना
अरबी सागराला
मराठी मनाला..........
आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.
चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.

जय भवानी, जय शिवाजी!
म्हणजे,
!! छत्रपति शिवाजी महाराज!!
=========================================

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,

हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......
=========================================

दुर रहा पडु नका आमच्या फंदात..
छत्रपति बाप आहे आमचा..
सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..
खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
जाऊन बघा ती औरंग्याची कबर
मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते
चळाचळा..
मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..
आरं अजूनही वेळ
गेली नाही बाळा..सांभाळुन राहा
आम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा...

--भागवत रोडगे
---------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.