II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:41:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       चारोळी, कविता क्रमांक-6
                               ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
... दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||
=========================================

शांत बसलेल्या वाघ्याला
दुबळा समजू नका,
फाडून टाकेल तुम्हा तो
त्याच्या वाटेला जाऊ नका,
आम्ही दिसतो साधे भोळे
आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,
करून टाकेन तुकडे तुकडे
आमच्या नादाला लागू नका..!!!
जय शिवाजी .......जय भवानी
=========================================

पुन्हा सुदूर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
=========================================

करुनी तांडव जिंकु
आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त...
ll जय शिवराय ll
=========================================

मित्रानो माझा रक्ता रक्तात
भिनलंय काय.....
.
.
..
.
.
.
जय शिवराय.... .
जय शिवराय.... .
=========================================

ढोलकीची थाप मी,
सागराची लाट मी,
संतांची वाणी मी,
शाहिरांची गाणी मी,
...
पावसाच्या गारा मी,
सह्याद्रीचा वारा मी,
शीतलतेचा चंद्र मी,
मराठ्यांचा मर्द मी,
उफळता लाव्हा मी,
सह्याद्रीचा छावा मी,
मावळ्यांचे रक्त मी,
शिवबांचा भक्त मी,
=========================================

मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तुज मानाचा मुजरा..
  =========================================

सळसळत राहू दे मर्द
मराठ्यांचे रक्त
येईल एक वक्त
जेव्हा होतील सर्व लोक मराठी अस्मितेचे भक्त
...
तेव्हा आठवेल सर्वाना
शिवराय
फ़क्त ||
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे
रक्त ||
आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे
भक्त ||

--भागवत रोडगे
---------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             ------------------------------------------------------ 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.