II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-11

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:52:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      चारोळी, कविता क्रमांक-11
                              ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

फुलाची कहाणी लिहिली वसंताने,
रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने,
मराठा नाही मिंदा कुणाचा...
कारण
मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने...!!!
=========================================

वाकडा जाणाऱ्याचा तुकडा पाडणारी माणसं
आम्ही
लढण्याचा मोह आवरत नाही
जर औकातीवर उतरलो तर मग पुढे
कोणीही टिकाव धरत
नाही
थाटला आम्ही अवघ्या महाराष्ट्राचा संसार
घेऊन पदरी माँ साहेब जिजाऊंचे
संस्कार ...आम्हीच लाविले भगवे झेंडे
अटकेपार
तळपली शिवछत्रपतिंची भवानि तलवार
या मातिची तहान आम्ही रक्ताने
भागविली
गुलामगीरीच्या काळजात ज्योत
स्वातंत्र्याची जागविली
पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राज
=========================================

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे...
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे...
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे.. जाउन
सांगा वादळांना,
तुमचि 'शिवबाच्या मावळ्यांशी' गाठ
आहे..... !!जय महाराष्ट्र !!
!!जय भवानी!!
!!जय जिजाऊ!!
!!जय शिवराय!!
=========================================

जर स्रुष्टि चे नियम नसते,,,,,
तर आमचे रक्तही भगवे असते......
हर हर महादेव...
.......जय भवानी
जय शिवराय.....
=========================================

जगताचा राजा माझा
गरीबांचा कैवारी
नाद घुमतोय दरीदरीतून
सह्याद्रीच्या कड्याकपार्यातून
"जय शिवराय जय शिवराय"
भगवा झळकतो डौलात
वीर मराठ्यांच्या उरात.
पेलतील भगवा बाहू आमचे,
आशिर्वाद आम्हा आई भवानीचां,
भीती नाही उरी आमच्या
राजे असता पाठीशी., वार्याशी संगत
आमुची
नात तलवारीशी
रक्ताचा अभिषेक केला
शपथ आहे स्वराज्याची...
होय.!!
पुन्हा एकदा चटक
लागली या मातीला मराठ्यांच्या रक्ताची...
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!
!! जय महाराष्ट्र !!
======================================

मर्द मराठा
माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचे
पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभर
ती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य
स्थापनेसाठी ...तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच
फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने
मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा
धोक्यात आहे आज
पुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून
नाराजी उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा तोच शिवाजी
******जय महाराष्ट्र********

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.