II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-13

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:56:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      चारोळी, कविता क्रमांक-13
                              ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

शांत असलो तरी अंत पाहु नका..
हि शांतता वादळा पुर्विची आहे..
आम्हाला गृहीत ठरवु नका..
रणांगनात उतरता उभ्या देहाने धडधड
जळतो..
औकातीवर आलोच तर तो काळही मग दुर
पळतो.. ईतिहास
घडविणाऱ्या राजा शिवछत्रपतिंची साथ
आहे..
मराठे भित
नाही कुणाला आमची वाघाची जात
आहे..
आम्हीच घेतल्या त्या तख्ताशी धडका..
आम्हीच
उडविला स्वातंत्र्याचा भडका..
ईथे आमच्याच रक्ताच पाणि झालय..
प्राणांच्या देऊन आहुत्या आम्ही
स्वराज्य उभ केलय.. जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राज
=========================================

मी मराठा, मी मराठा, जगतो,
लढतो मराठा,
धुळ चारुन गनिमास,
पुरुनी असा उरतो मराठा,
मायभूमी धन्य ती, जन्मला एक थोर
मराठा,
स्वराज्याचे तोरण बांधुन,
नडला तो एक
मराठा . . .
हिंदवी स्वराज्य तो, तळपतो, तडपतो,
गुलामीची साख तोडून, एक मराठा लढतो,
काय थोरवी गावी त्यांची, मनी प्रश्न
दाटतो,
रयतेचा राजा माझा,
अजुनही हवासा वाटतो . . .
थोर असा माझा राजा,
ख्याती उभ्या जगात,
आजही जिवंत आहे, आमच्या तनात, मनात,
मराठीचा मान त्या मराठ्यानं मिळवला,
झुकवुन असे गनिमास, हिंदवी स्वराज्य
घडविला . . .
स्पृश्य आणि अस्पृश्य न भेद तू
मानला,
मी रयतेचा आणि रयत माझी, धर्म
मराठी आणला,
जाण ठेवून मनी, इतिहास तुझा वाचिला,
गर्वच नाही तर माज
मराठी असल्याचा मग
वाटला . . .
नमन करत तुला आशि॔वाद मागतो आहे,
मी मराठा, मी मराठा करत फ़क्त
मराठी जगतो आहे . . .
=========================================

इतिहास घडविणारे आम्ही मराठे
ऐसे जन्मीले ना कोठे
झुकविले त्या हिमालया
पुजतो आम्ही फक्त शिवराया
सहण होत नाही आम्हाला
स्वराज्याशी फरेब
जातिवंत
मराठ्यांच्या छातित धडकतात
आऊसाहेब ... अजुनही शरीरावर त्याच
जखमा उभळतात
शंभु अठवला कि डोळ्यातले अश्रृ
आपोआप ढळतात
विसरलो नाहीत त्यालाखो मावळ्यांचे
बलिदान
मराठयांला आजही वाटतो त्यांचा अभिमान
जिथे पडती पाऊल आमचेत्याच
इतिहासाच्या वाटा वाकत तर नाहीच पण
मोडणार
हि नाही आता हा मराठा
चमकतात तेज तलवारीच्या धारा
दिशा बदलतो पाहुन
आम्हाला वादळी वारा
मराठे आम्ही जगने आमचे ताठ आहे
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्द
मराठ्यांशी गाठ आहे...........!!!
जय भवानी
जय जिजाऊ....!!

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.