II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-14

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 07:58:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                     चारोळी, कविता क्रमांक-14
                             ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

नावापुढे "राजे" लावून जर
"राजेपण" आले असते,
तर जिजाऊंनी शिवबांचा जन्म
होताच,
त्यांचे नाव "शिवाजीराजे" ठेवले
असते, "शिवाजी" नाही. जय जिजाऊ, जय
शिवराय..........!
=========================================

तुफान सळसळते रक्तात..
अशी ताकद या शिवभक्तात..
सागरी लाटा उसळती काळजात..
शिवरायांचा मावळा तोच ज्याला नसे
धर्म
जात..
कसली हि मंदिरे दगडांची..
जाती पातीच्या भगदडांची..
आम्ही रानभर फिरणारी वादळे..
आम्ही शिवबाची मावळे.. जय जय जय जय
जय शिवराय
=========================================

'' मराठा आपली जात ''
'' जगणं आपल ताट ''
'' आम्हीच इथले सम्राट ''
'' तलवारी घुमतील सुसाट ''
'' वाहतील रक्ताचे पाट ''
'' लक्षात ठेवा आमच्याशी आहे गाठ ''
शिवसकाळ मावळ्यांनो.....
!! जय शिवराय !!
=========================================

फाडुनी कोथळा छातीचा मी मान
राखीला मातीचा |
षंड निजवले घावासरशी,
मी"मराठा"जातीचा
=========================================

सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला.
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला,
पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला.
मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला.
ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला.
त्याच्या हातून
हिँदवी स्वराज्य निर्मिल .
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते
सळसळायला.
तोड नव्हती शिवबाला.
त्याचा नावाने सारा महाराष्ट्र
गरजला. जय भवानी.....!!
जय शिवराय.....!!
हर हर महादेव.....!!
मुजरा राज् मुजरा.....
=========================================

तलवारीचा घाव..
अन
मराठ्यांच नाव..
एकदा कोरले ते कोरले
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।। जय जिजाऊ जय शिवराय।।
=========================================

हि विखारी नजर हि वाघाची जात....
रगत ओकते पाहुन अन्याय करनारे
हात....
तहानलेली तलवार हि गनिमावर दात.....
तप्त लाव्हा सळसळतो आमच्याच
रक्तात..... हि धगधगती आग आहे वंश
परापंरागत......
कवटाळले दुखः रयतेचे याच
छाताडात........
घाव अजुनही रक्ताळतात कधी कधी याच
काळजात.....
हिम्मत असेल तर डोकावुन बघ
इतिहासात.... पेटतील पीढ्यान
पीढ्या मशाली..
गाजेल मराठ्याचीं रण किलकारी..
वनव्यात बदलेल हि ईतिहासाची आग....
लांडगी टोळक्याने फिरतात
एकट्याने शिकार
करतो हा पहाडि जातीचा वाघ..... जय
जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुं राजे....!!

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
             ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.