II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-16

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 08:02:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                    चारोळी, कविता क्रमांक-16
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

होता आईचा मान
शत्रुच्या स्त्रियालाही..
अशी माझ्या शिवबाची शिवशाही..
बाजिरावांची किर्ती लोपली मस्तानीच्या पाई..
मराठ्यांच पानिपत करुन
गेली पेशवाई..
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।
।। जय महाराष्ट्र ।।
=========================================

सरसेनापती हंबीरराव मोहितेची २०
किलोची तलवार ह्याच तलवारीने
अफझलखानाच्या सैन्यातले ६०० शत्रु
एकाच लढाईत कापले होते...................
आपल्याला साधे ५ किलो चे वजन
उचलण्यास जड जाते विचार करा २०
किलो ची तलवार एका हातात उचलणे,
आणि त्याने शत्रूचा फडशा देखील
पाडणे किती जिद्दीचे आणि ताकदीचे
काम असेल
=========================================

लोक म्हणतात हे
विश्व देवाने बनवल आहे
पण
मी म्हणतो आम्हा मराठ्यांना छञपतींनी बनवल
आहे.....
=========================================

पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ
आहे,रक्तातला लाव्हा आजही उफाळत
आहे,डोऴयातला निखारा आजही लाल आहे,
आडवे येऊ नका मराठ्यामध्ये
आजही "शिवबा" तसाच आहे.
=========================================

आमच्या शिवरायांचे वादळ अजून
थोडा वेळ जरी घोंगावले असते तर,
त्यांनी हिंदुस्थानाच काय पण
उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले
असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजूनकाही काळ
जर धगधगत राहिल्या असत्या तर,
त्यांनी आज
सातासमुद्रापारही स्वराजाच्याच
नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने
वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर
हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून
थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेहि "जय जिजाऊ
जय शिवराय" ची आरोळी ठोकली असती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर
अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय
पण"व्हाईटहाउस"वर भगवा झेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकालीजाण्याने
त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच
नाही पूर्ण झाली.
आता तरी उठा मर्द
मराठ्यानो एकीची वज्रमूठ
बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल
पेटवुया.

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.