II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-चारोळी, कविता क्रमांक-18

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 08:06:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                    चारोळी, कविता क्रमांक-18
                              ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी व कविता.

पेटविली रणांगने देह
झिजविला मातिसाठी...!!!
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक
जातीसाठी...!!!
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे...!!!
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे...!!!
=========================================

जय शिवरायमातीसाठी खपतो आम्ही,
कुढत जगणे जमत नाही।
लढत-लढतच मरतो आम्ही,
मेलो तरीही संपत नाही।
स्वराज्याचे तोरण बांधले,
येऱ्या-गबाळ्याची संगत नाही।
मुजरा करतो फक्त राजांना,
उगाच कुणापुढेही झुकत नाही।
किती तलवारींचे वार जाहले,
तोडले तरीही तुटत नाही।
मीच मावळा, मीच मराठा,
कोथळ्याशिवाय परतत नाही ...
!! जय शिवराय !!
=========================================

किनारयाची कींमत
समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव
लागत.....
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात
फिराव
लागत.........
आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य
समजण्यासाठी मराठीच असाव लागत.....
||"जय भवानी"!!
!!"जय शिवराय"||
=========================================

संभाजी महाराजांना पकडल्यावर
औरंगझेबा कडे
बघनारी ती संभाजी महाराजांची नजर
बघुन तो म्हणाला, ''ये मरहट्टे
क्या खिलाते है अपने बच्चो को..
क्युं पैदा नही हुआ ऐसा एक भी शक्स
हमारे जनाने में.'' त्यावर
गरजला सर्जा संभाजी राजा, ''अरे
स्वताच्या बापाला विष देऊन
मारणारा तू.
स्वताच्या भावांची खुलेआम कत्तल
करणारा तू.
तुझ्या पोटी कसा जन्माला येईल
संभाजी. संभाजी जन्माला येईल तर
फक्त सह्याद्रीच्या कुशीत
आणी शिवछत्रपतींच्या मुशीतच.''
शुभ संध्याकाळ......
=========================================

जिथे पडती पाऊल आमचे त्याच
बनती इतिहासाच्या वाटा..
वाकत तर नाहीच पण मोडणार
हि नाही हा मर्द मराठा..
चमकतात आमच्या आज ही तेज
तलवारीच्या धारा..
दिशा बदलतो पाहुन
आम्हालाहा वादळी वारा..
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे
ताठ..
आडवे जाण्याआधी विचार
कराया मर्दमराठ्याशी आहे गाठ...

--भागवत रोडगे
---------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भागवत रोडगे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
              ----------------------------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.