चारोळ्या-"नैसर्गिक तलावांवर आलीय आपत्ती,कृत्रिम तलावांवर आलीय विसर्जन स्थिती"

Started by Atul Kaviraje, February 21, 2022, 01:37:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

             विषय : छट -पूजेसाठी  मुंबईत  बांधलेत  कृत्रिम  तलाव
                   वास्तव  कोरोना  सोशल  डिस्टंसिंग  चारोळ्या
   "नैसर्गिक तलावांवर आलीय आपत्ती,कृत्रिम तलावांवर आलीय विसर्जन स्थिती"
  -------------------------------------------------------------------


(1)
तलाव ,तळे ,नद्या ,ओढे ,नाले ,समुद्र  सर्व  ओस  पडत  चाललेत
कोरोनाने  त्यांचे  जणू  असणेच ,अस्तित्त्वच  हिरावून  घेतलेय
गणेश -विसर्जन  झाले  होते  यंदा , बांधलेल्या  "कृत्रिम  तलावांमध्ये" ,
"छट पूजा"  आणि  विसर्जन  होतंय , मानव -निर्मित ,बांधीत  तलावांमध्ये.

(2)
ही  आहे  कोरोनाची  मोह -माया  बरं  सारी  !
सोशल  डिस्टंसिंगचा  नियम  फिरतोय  अजुनी  दारो -दारी
एकत्र  जमणे  नाही , खेळणे  नाही , फॅमिली  गेट -टुगेदर  नाही ,
समुद्र -किनारा  नाही , चित्रपट  गृह  नाही , काहीच  उरलेले  नाही .

(3)
"छट -पूजा"  पर्वाचे  केले  जाते , दरवर्षी  उत्साहाने  पूजन
स्त्रिया ,मुली  सारे  साजरे  करिती  पूजेचे  आयोजन , नियोजन
पूजा  संपली  आता , विसर्जनाची  होतेय  तयारी , जळामध्ये ,
पण  हाय  रे  कर्मा !, कोरोना  आधीच  दडी  मारून  बसलाय  तळ्यामध्ये .

(4)
न  भूतो , न  भविष्यती , असे  दिवस  पाहावयास  मिळताहेत
"छट -पूजा" अन  विसर्जनास  पाण्याचे  "कृत्रिम  तलाव"  ठीक -ठिकाणी  बांधताहेत
जणू  तळ्यातच पूजन  विसर्जन  केल्याचे  पुण्य  जन  पदरी  पडताहेत ,
येतील  का  ते  दिन  परतुनी , सारे  पुढील  वर्षाची  वाट  पाहताहेत  !

(5)
आज  तलाव ,नदी ,ओढ्यावर  शेवाळ -गाळ  तवंग  साचून  राहिलाय
कोरोनामुळे  त्यांचा  किनाराही  आता  ओस  पडत  चाललाय
मुंबईत  ठीक -ठिकाणी  "कृत्रिम  तलावांचे"  बांधकाम  अजुनी  जोरात  सुरु  आहे ,
त्या  निसर्ग -सौंदर्याचा ,समुद्र -तलाव -नद्यांचा  मानवास  विसरच  पडत  चाललाय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.02.2022-सोमवार.