जाणता राजा

Started by siddhesh 68, February 21, 2022, 04:19:03 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

जाणता राजा

हिंदूंचा स्वाभिमान,
स्वराज्य हाच किर्तीमान,
बहुत जनांसी आधारु,
मलेछा आजही सुधारू ....

शिवाजी महाराज,
नामाने चढते आम्हा स्फुरण,
शिवतोरण आजही तारणहार ,
दुसरा कुठला आमचा जीर्णोद्धार?

शिवशंभू जोडगोळी,
हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवली ,
दिग्विजयाची माला ओवली,
आम्हाला हिंच कहाणी  भावली!

सागरावर राजांचा संचार,
हिंदमाता न विसरेल परोपकार,
बुडवले चाचे आणि गनीम,
नसतील आमचे किल्ले अप्रतिम!

माता पिता गुरूस मानले दैवत,
यांच्यामुळे देवघरात दिसतात देव,
जर युद्धाला फुटले पेव,
हिंदू आठवतील शिवाजी महाराज सदैव |

सिद्धेश सुधीर देशमुख

19 Feb 2022