.......तू असशील ना !!!!

Started by अतुल देखणे, May 18, 2010, 12:18:00 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

 .......तू असशील ना !!!!

जीवनाच्या या सुखद वाटेवर चालत असताना,
नागमोडी वळणातून काटेरी रस्त्यावर जाताना....सोबत तू असशील ना !!!!

माधुर्याचा स्वाद आणि सौदर्याचा आस्वाद घेत असताना,
सोनेरी या मनाला चंदेरी चाहूल देताना......समोर तू असशील ना !!!!

सूर्यास्ताच्या वेळी चंद्रोदय पाहत असताना,
आकाशातील हा निसर्गरम्य  देखावा कागदावर रेखाटताना......रंगात तू असशील ना !!!!

मदमस्त अशा शीत शब्दात तुझ्यावर लिहित असताना,
रूप तुझे माझ्या कवितांतून व्यक्त करताना.....जवळ तू असशील ना !!!!

शब्दवेड्या या माझ्या भावनांना हृदयात स्थान तू देशील ना आणि....
प्रेमाच्या या रिमझिम वर्षा मध्ये भिजून चिंब होताना......सोबत तूच असशील ना !!!!


अतुल देखणे

nirmala.


gaurig


PRASAD NADKARNI