II महाशिवरात्री II-हार्दिक शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 02:11:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II महाशिवरात्री II
                                      हार्दिक शुभेच्छा क्रमांक-2
                                    -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२, मंगळवार आहे. आज "महाशिवरात्री" आहे.भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी महाशिवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. "ओम नमः शिवाय" हा मंत्र जपूया, आणि वाचूया, या पावन रात्रीनिमित्त लेख, कथा, पूजा विधी, माहिती, निबंध,भाषण,शुभेच्छा, शायरी, स्टेटस इत्यादी.

चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची...!
--हर हर महादेव

संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये
नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये
चला बनुया शंकराच्या चरणांची धुल
मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल.
--भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो.

मृत्यूचे नाव काल आहे,
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत.
--हर हर महादेव.

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
--ओम नमः शिवाय

भटकून भटकून जग हरलो,
संकटात दिली नाही कोणी साथ
मिळून गेले प्रत्येक समस्येचे निराकरण
जेव्हा महादेवांनी धरला माझा हात

महादेवा तुझ्या शिवाय सर्व व्यर्थ आहे
मी आहे तुझा आणि तू माझा अर्थ आहे
--हर हर महादेव

हे महादेवा तुझ्यावर प्रेम करणारे
या जगात असतील अनेक...
परंतु या वेड्याचे तर तूच जग आहेस.
--ओम नमः शिवाय

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशमराठी.कॉम
                       -----------------------------------------                             


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.