स्वच्छताचारोळ्या-"रॅली निघाली मुंबईला स्वच्छतेची,चालणाऱ्या आवडणाऱ्या यापर्वाची"

Started by Atul Kaviraje, March 03, 2022, 01:45:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय : "वौक फॉर  SLUM-FREE MUMBAI" अंतर्गत  रॅलीचे  आयोजन
                          वास्तव  स्वच्छता  मोहीम  चारोळ्या
        "रॅली निघाली मुंबईला स्वच्छतेची,चालणाऱ्या आवडणाऱ्या या पर्वाची"
--------------------------------------------------------------------


(1)
"स्वच्छता"  मोहीम  असो , वा  असो  साक्षरता  मोहीम
मी  "चालण्याची"  एकही  संधी  सोडत  नाही
अतिशय  आवड  मला  "चालण्याची"  लहानपणापासूनच ,
"स्वच्छता  रॅलीच्या"  नावाखाली  मी  "चालतच"  राही .

(2)
स्लम  विभाग  वाढत  चाललेत  मुंबईत
गरीबाच्या  राहण्याचे ,उदार -निर्वाहाचे  एक  स्थान
परवडत  नाही   खिशाला , झोपडी  बांधून  राहतो ,
पाठोपाठ  पहाता -पहाता  झोपड्यांचा  टेकाड  उभा  राहतो .

(3)
"चालणाऱ्यांनी"  खूप  प्रयत्न  केले  आजपावेतो  चालून
धावणारेही  खूप  धावले  फार  पूर्वीपासून
सायकल -वाल्यानी  तर  "रॅलीची"  केली  होती  खैरात ,
पण  फ्री  काही  होत  नाहीत ,उलटी  वाढच  होतेय  स्लम -एरियात .

(4)
सरकारचा  उपक्रम  स्तुत्य , अभिनव  असाच  आहे
पण  त्यावर , "चालणारी  रॅली" , हा  काही  उपाय  नव्हे
स्लम  एरियाचे  पुनर्वसन  व्हावे ,गरिबांना  मिळावे  नवे  घर  बांधून ,
"चालणाऱ्या"  पायांपेक्षा  काम  करणाऱ्या  हाताने  द्यावा  हा  दुवा  सांधून .

(5)
मुंबई  आमची  आहे , मुंबई  तुमचीही  आहे
मुंबई  काल  पण  होती , मुंबई  उद्याही  असेल
स्वच्छतेचे  नारे  लावणाऱ्यांनी ,करावा  फ्री  स्लम  एरिया
मुंबईला  आवडेल ,स्वच्छतेचा  पायI  इथे  रुजताना  पहाया .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.03.2022-गुरुवार.