चारोळ्या-"कांद्याने पाणी आणलंय डोळ्यांत,रोटाव्हेटर फिरतोय कांद्याच्या शेतात"

Started by Atul Kaviraje, March 06, 2022, 01:58:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय :धुळे  येथे  शेतात  कांद्याच्या  पिकावर  फिरविला  रोटाव्हेटर
                       वास्तव -कांदा  नुकसान  चारोळ्या
   "कांद्याने पाणी आणलंय डोळ्यांत,रोटाव्हेटर फिरतोय कांद्याच्या शेतात"
  -------------------------------------------------------------


(1)
यंदा  अमाप ,भरघोस  पिकं  आलंय  "कांद्याचे"  शेतात
परी  दर  भिडत  गगनाला , शेतकऱ्यांना  मोल  नाहीय  मिळतं
नाईलाजाने  फिरवावा  लागतोय  "रोटाव्हेटर" , पाणी  आणीत  डोळ्यांत ,
"कांद्याने"  रडवलंय  शेतात , असं  नाही  तर  तसं , या  नूकसानात .

(2)
आता  शेतकऱ्यांना  नाही  लागत , काहीही  कारण  नासाडीसाठी
त्यांच्याकडे  "रोटाव्हेटर"  तयारच  असतो , नासधुसीसाठी
पाऊस  नाही , पाणी  नाही , भाव  नाही , दर -वाढ  होई ,
चाक हाती घे आणि फिरव"रोटाव्हेटर"शेतात,अकारण,विनाकारण,कोणत्याहीकारणांसाठी 

(3)
शेतकरी  आज  आपलेच  नुकसान  आपल्याच  हाताने  करतोय
त्यासाठी  तो  पुढचा -मागचा  विचारच  नाही  करत
बुद्धी  भ्रष्ट  झाल्याप्रमाणे  तो  शेतात   "रोटाव्हेटर" फिरवतोय ,
दुसरा  कोणताही  मार्ग  नसल्यामुळे , अविचारच  जन्म  घेतोय .

(4)
शेतकऱ्यांना  त्यांचा  हमी -भाव  मिळावयास  हवा  पिकांसाठी
योग्य  तो  मोबदला  मिळावयास  हवा , त्यांच्या  या  मेहनतीसाठी
नाहीतर  "कांद्याप्रमाणेच"  इतरही  पिके  त्यास  रडवतील ,
त्यांच्या  स्वहस्तेच  ती  नुकसानीस , बरबादीस  कारणीभूत  होतील .

(5)
वेळ , पाळी  आलीय  आज  शेतकऱ्यांवर , शेती  सोडण्याची
कदर  नाही  सरकारास  त्यांच्या  श्रमांची , कष्टांची , मेहनतीची
स्वतःच्या  हाताने  फुलवलेला  मळा , स्वतःच  करायचा  ओसाड   माळ ,
नंदन -वनाचे  सपाट  रान  होताना  पाहून , त्यांच्या  हृदयी  पेटतोय  जाळ  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2022-रविवार.