II आंतरराष्ट्रीय महिला दिन II-लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 12:27:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II आंतरराष्ट्रीय महिला दिन II
                                           लेख क्रमांक-1
                                 -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

             आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा करतात?---

     आज जगभर महिला दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गुगलने आजचं डुडल महिलांना समर्पित केलं आहे. एका 3D अनिमेशनच्या माध्यमातून हे डुडल तयार करण्यात आलं आहे. न्यूयॉर्क आणि लंडनमधील काही कलाकारांनी ते साकारलं आहे. त्यात या दिवसाच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या व्हीडिओच्या सुरुवातीच्या भागात 1800 ते 1930 या काळातील कामगार चळवळीवर भर देण्यात आला आहे. नंतर 1950 ते 1980 हा काळ दाखवण्यात आला आहे. हा काळ महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. त्या काळात महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानतेसाठी जोमाने प्रयत्न होऊ लागले होते. त्यानंतर 1990 ते आजपर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. गेल्या 100 वर्षांत महिलांच्या हक्काबाबत काय प्रगती झाली हे दाखवण्याचा उद्देश असल्याचं गुगलने सांगितलं आहे.

     पुरातन काळात लिंगाधारित भूमिका आणि समाजातील महिलांचं स्थान याविषयी असलेले गैरसमज दूर करून स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या महिलांना हे डुडल समर्पित करत असल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.

     जगभरात गेली कित्येक वर्ष लोक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
                         जागतिक महिला दिन कधी सुरु झाला?---

     आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.

     याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या - चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा. या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बीबीसी.कॉम)
                        --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.