II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, March 07, 2022, 11:52:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                       शुभेच्छा संदेश क्रमांक-5
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     महिला आजकाल प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत. म्हणूनच तुमच्या सहकाऱ्यांसोबत शेअर करा हे शुभेच्छा संदेश

1. यशस्वी महिला कोणालाच आवडत नाहीत. मला वाटतं वैज्ञानिक जगात चांगले सहकारी न मिळणं हा महिलांसाठी असलेला सर्वात मोठा धोका आहे – ख्रिस्टिन नुस्लेन वोलहार्ट

2. खरी उर्जा तुमच्यात आहे तिला फक्त ओळखा.

3. जीवनात नेहमी मोठा विचार करा कारण विचार जीवनाला आकार देतात.

4. कोणतीच स्त्री अशा पुरूषासोबत काम करू शकत नाही जो कतृत्ववान नाही.

5. जे पुरूष महिलांचा सन्मान करतात त्यांचा सन्मान संपूर्ण जग करतं.

6. जेव्हा स्त्री स्वतःच स्वतःची मैत्रीण होते तेव्हा तिचं आयुष्य सुखकर होतं.

7. एक कणखर स्त्रीच दुसऱ्या स्त्रीमध्ये तिच्यासारखा आत्मविश्वास निर्माण करू शकते.

8. प्रोत्साहनपर पुस्तकं वाचणं हा शहाणपण मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.

9. चांगली लेडी बॉस असेल तर त्या कंपनीचं भविष्य नक्कीच उज्वल ठरू शकतं.

10. पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य नक्कीच जास्त असतं.

11. जी महिला अन्यायाविरूद्ध आवाज उठवते तिच खरी सामर्थ्यशाली आहे.

12. महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, म्हणून त्यांच्याविषयी बदला आता तुमचे विचार


--तृप्ती पराडकर
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.