II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा संदेश क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 12:00:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II जागतिक महिला दिन II
                                        शुभेच्छा संदेश क्रमांक-9
                                    --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छापत्रे, Facebook आणि WhatsApp मेसेज

     जागतिक महिला दिन साजरा (Women's Day 2022) करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 1909 साली झाली होती. त्यानंतर 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत एक ठराव मांडण्यात आला आणि त्या सुचनेनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (Internation Women's Day) म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना, आई, बहिण, पत्नी तसेच इतर महिलांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतात. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या मेसेजेसच्या माध्यमातून द्या महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्त्री असते एक आई
स्त्री असते एक ताई
स्त्री असते एक पत्नी
स्त्री असते एक मैत्रिण
प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान
--महिला दिनाच्या शुभेच्छा

हसून प्रत्येक वेदना विसरणारी
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी
ती शक्ती आहे एक नारी

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या
आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व सारे वसावे
--महिला दिनाच्या शुभेच्छा

नारी हीच शक्ती आहे नराची...
नारी हीच शोभा आहे घराची...
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
--जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्त्री आहे या सृष्टीचा आधार
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार

जी नेहमी करते केवळ त्याग
दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार
मग तिलाच का केवळ त्रास
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
--महिला दिनाच्या शुभेच्छा


--ऑनलाइन लोकमत
-------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकमत.कॉम)
                        ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.