II जागतिक महिला दिन II-लेख क्रमांक-4-अ

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 12:05:26 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                         लेख क्रमांक-4-अ
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

   आपल्या देशात तर अलीकडच्या काळात महिलांचे हे गुण फार प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. दहावी आणि बारावी सारख्या मोक्याच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा तर मुलींच्या पासाचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. समान परिस्थितीतील मुले, शिक्षणही समान परंतु लिंगभेदामुळे येणारे गांभिर्य इतके भिन्न असते की मुली घरकामात लक्ष घालूनही मुलांपेक्षा अधिक गुण मिळवतात. हे सारे दिसत असूनही समाजातले पुरुष मुलींकडे किंवा महिलांकडे आदराने तर सोडूनच द्या पण समानतेच्या भावनेनेसुध्दा बघायला तयार नाहीत. अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीशी विवाह होतो तेव्हा आजवर रूढ असलेल्या पध्दतीनुसार मुलगी मुलाच्या घरी जाते हा प्रवाह उलटा करण्याची हिम्मत अजून तरी कोणत्याही देशात दाखवली गेलेली नाही. सगळ्या जगात, सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये मुलगी विवाहानंतर मुलाच्या घरी नांदायला जाते. हा व्यवहार म्हणून मान्य करू परंतु आपल्या भाषेमध्ये या नातेसंबंधाविषयी बोलताना 'अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली', अशी भाषा वापरली जाते. तिच्यातूनच समाजाची मानसिकता प्रकट होते.

     सध्या तर मुली मोठ्या प्रमाणावर शिकत आहेत आणि भारतात हळूहळू शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे मुलींचे प्रमाण मुलांच्या बरोबर व्हायला लागले आहे. निदान या पातळीवर तरी, मुलीच्या जातीला शिकून करायचेय काय? असा प्रश्‍न विचारण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य झाले आहे. परंतु या शिक्षणाच्या समान संधीचा अर्थ लोकांच्या मनात मुलीविषयी समानतेची भावना निर्माण झाली आहे असा काढू लागलो तर ती चूक ठरेल. आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, रोटी व्यवहार अशा रूढींचा त्याग केला गेला आहे. परंतु त्या त्यागामागे सामाजिक जाणीव आहे असे म्हणता येत नाही. नाईलाज म्हणून, निरुपाय म्हणून आणि आता गत्यंतरच नाही म्हणून या रूढींचा आपण त्याग केलेला आहे. तीच गोष्ट मुलींच्या शिक्षणाला लागू आहे. मुलगा आणि मुलगी यांच्याकडे समानतेच्या भावनेतून बघण्याची वृत्ती वाढली म्हणून मुली शाळेत जात आहेत असे नाही. तर शिकल्याशिवाय मुलींचे लग्न ठरू शकणार नाही या निरुपायापोटीच मुलींना शाळेत पाठवले जात आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण वाढत असले तरी मुलींकडे समानतेच्या भावनेने बघण्याची प्रवृत्ती वाढली आहे असे काही नाही. तेव्हा समाजामध्ये मुलींकडे समानतेच्या भावनेने प्रवृत्ती वाढवली गेली पाहिजे.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझा पेपर.कॉम)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.