II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:15:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II जागतिक महिला दिन II
                                           शुभेच्छा क्रमांक-1
                                   ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

    आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

     आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना फार महत्व आहे. त्यांचे विशेष सन्मान आणि कौतुक केले जाते.आपल्याकडे महिलेला देवीचे रूप मानले जाते.

     पुराणातील श्लोक मध्ये देखील स्त्रियांचा महत्वपूर्ण उल्लेख केला गेला आहे.जसे की "यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता" या ओळींचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी नारीचे पूजन केले जाते,त्या ठिकाणी भगवंत निवास करतात.

     आजच्या आधुनिक काळात स्त्रियांबद्दल लोकांचे विचार हे बदलले आहेत.आजचे लोकं महिलांना सगळीकडे वाव मिळवा आणि ते सर्वत्र सक्षम व्हावे या साठी प्रयत्नशील आहेत.

     स्त्रियांनी कुठेही कमी पडू नाही अशी सर्वांची भावना आहे.स्त्री ही फक्त घराची नाही तर आपल्या देशाचा अभिमान आहे.आजच्या महिला पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहेत.

     आता महिलांना त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा हे माहित आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या कामगिरीची गणना करता येईल. विविध क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती हे अजून वाढावी आणि महिला अजून सक्षम व्हाव्या या प्रबळ भावनेने जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

=========================================
Women's Day Quotes In Marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
=========================================

     महिला दिनाचा इतिहास खूप जुना आहे. जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.

     या वर्षीच्या जागतिक महिला दिन 2022 दिनाची theme आहे – शाश्वत उद्यासाठी आजपासून स्त्री पुरूष समानता.

     जगभरातील महिला आणि मुली हवामान बदल,त्याचे आपल्या पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम व ह्याला आपण कमी करून शाश्वत उद्याचे भविष्य कसे बनवू यावर संशोधन करून आपले मौल्यवान योगदान देत आहेत.त्यांचे कौतुक करण्यासाठी यंदा ही थीम ठेवण्यात आली आहे.

     आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, तुम्ही देखील महिला दिनाचे quotes, महिला दिनाचे सूविचार आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शेअर करा.


--मराठी डिजिटल
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                  -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.