II जागतिक महिला दिन II-कोट्स क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:25:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II जागतिक महिला दिन II
                                           कोट्स क्रमांक-2
                                     -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

=========================================
Stree Shakti Quotes in Marathi | Women's Day Quotes in Marathi
=========================================

     आंतरराष्ट्रीय महिला दिन (stri quotes in marathi) हा महिलांसाठी अतिशय खास दिवस मानला जातो. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

     अनेक देश या दिवशी नोकरदार महिलांना सुट्टी देतात.चीन मध्येही या दिवशी काही ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी दिली जाते. इटलीमध्ये महिला दिन ला फेस्टा डेला डोना म्हणून साजरा केला जातो.

     ८ मार्च रोजीच्या या महिला दिनानिमित्त, तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना, महिलांनाही या दिवशी शुभेच्छा द्याव्यात (stree shakti in marathi).

दया नको आदर हवा....!
माणूस म्हणून सन्मान हवा.....!
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...!

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे,
गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व सारे वसावे,
--महिला दिनाच्या शुभेच्छा.

तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता.
--महिला दिनाच्या शुभेच्छा...!!

सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!
--जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ आहेत.
आई,बहिण,बायको
व अर्धे शक्तिपीठ मुलगी..
करुया स्त्रीशक्तीचा जागर..
फक्त एका
दिवसपुरता नाही दररोज...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


--मराठी डिजिटल
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.