चारोळ्या-"कातकरी पाडा गुलामगिरीतच वावरतोय,वेठबिगारी त्यांचे आयुष्य बरबाद करतेय"

Started by Atul Kaviraje, March 15, 2022, 01:28:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय  : वेठबिगारी  प्रथा  अजूनही  छळतेय  कातकरी  समाजास
      वास्तव  वेठबिगारीची  कातकरी  समाजाची  पिळवणूक  चारोळ्या            "कातकरी पाडा गुलामगिरीतच वावरतोय,वेठबिगारी त्यांचे आयुष्य बरबाद करतेय"
----------------------------------------------------------------------


(1)
गरिबीचा  गैरफायदा  घ्यायचा ,अखिल  समाजाला  "बिगारीला"  लावायचे
हेच  घडत  चाललंय  आतापर्यंत  या  मूठभर  धन -दांडग्या  ठेकेदारांकडून
भरपूर  देऊन  त्यांची  "वेठबिगारी"  करायची , पिळवणूक  करायची ,
ठेका  देऊन  "कातकरी"  समाजास  पिडून , छळून  आपली  पोतडी  भरायची .

(2)
गरीब  समाज ,कष्टकरी  समाज , हा  "कातकरी"  महाराष्ट्रातला
बळी  पडतोय , राब -राब  राबतोय , ठेकेदाराच्या  एका  आमिषाला
भोळ्या  समाजाचा  घेऊन  गैरफायदा , मरेस्तोवर  काम  करून  घेताहेत ,
"कातकरी"  समाजास  नाही  भविष्य , त्यांचे  जीव  वर्तमानातच  घुसमटताहेत  .

(3)
"वेठबिगारी" , गुलामगिरी  अनिष्ट  प्रथा , अजूनही  दिसतेय  गावा -गावांतून
घर ,लग्न  ,शिक्षण  कर्ज  देऊन  ठेकेदारांनी  स्वातंत्र्य  घेतलंय  हिरावून
सहा -सहा  महिने ,वर्ष -वर्ष  भर , घराकडे  नाही  देत  परतू  गरिबांना ,
पिळवणूक  करताहेत ,मनमानी  करताहेत , हे  ठेकेदार  राब -राब  राबवून  त्यांना .

(4)
ही  पिळवणूक ,छळवणूक ,"वेठबिगारी"  केव्हा  थांबणार  महाराष्ट्रातली  ?
७५  वर्षे  झाली  मिळून  स्वातंत्र्य , पण  त्यांची  नाही  अजुनी  पहाट  उगवली  !
खितपत  पडलेत , जुलूम  सहताहेत , मुकाट  हे  "कातकरी"  अंधाऱ्या  साम्राज्यात ,
केव्हा  थांबेल  हे सारं, या "वेठबिगारीतून"  केव्हा  येतील  ते  बाहेर  मुक्त  प्रकाशात  ?

(5)
सरकारने  या  "कातकरी"  समाजाचे  हक्क  त्यांना  पुनर -प्राप्त  करून  द्यावे
या  "वेठबिगारी"  अनिष्ट  प्रथेचे  समूळ  उच्चटन  व्हावे
समाजोपयोगी  संस्था ,मानवाधिकार  समितीने  यात  विशेष  लक्ष्य  घालावे ,
तीही  माणसचं  आहेत ,गुलाम  नाहीत ,त्यांना  पुन्हा  एकदा  स्वातंत्र्य  मिळावे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.03.2022-मंगळवार.