II होळी II-लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 17, 2022, 01:14:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                              II होळी II
                                            लेख क्रमांक-4
                                           --------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार आहे. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

     "फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. . होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत."

     भारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी हा असा हिंदू सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन, रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी काही खास खाद्यपदार्थही केले जातात. यासाठीच प्रत्येकाला या सणाची माहिती माहीत असायला हवी. म्हणूनच जाणून घेऊया होळी सणाची माहिती मराठी आणि बरंच काही...

=========================================
                               Table of Contents
होळी सणाची माहिती आणि होळी कधी साजरी करतात (Holi Information In Marathi)
होळी का साजरी करतात (Why We Celebrate Holi)
होळीचा सण साजरा केला जातो या खास खाद्यपदार्थांनी (Holi Special Recipes In Marathi)
होळी सणाची माहिती आणि होळी कधी साजरी करतात (Holi Information In Marathi)
=========================================

     होळीचा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. यावर्षी 9 मार्च 2020 या दिवशी होळी तर 10 मार्च 2020 ला रंगपंचमीचा सण आहे. या रंगपंचमी सणाची माहिती विशिष्ट आहे. संपूर्ण भारतात होळीचा सण साजरा केला जातो. एवढंच नाही तर या सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी सर्वांना होळी माहिती (holi festival information in marathi) असायलाच हवी. होलिकादहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून धुळवड साजरी केली जाते. भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, आसाम, बनारस, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, मथुरा – वृंदावन, नागालॅंड, ओरिसा, पांडेचरी, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड या ठिकाणी होळी साजरी केली जाते.
भारतात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीचा सण शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच शिमग्यालाही कोकणात उत्साहाचं वातावरण असतं.

--तृप्ती पराडकर
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.03.2022-गुरुवार.