II होळी II-पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 11:28:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II होळी II
                                  पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-1
                                 ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

     होळीचा सण साजरा केला जातो या खास खाद्यपदार्थांनी (Holi Special Recipes)
भारतात विविध ठिकाणी होळीसाठी निरनिराळे खाद्यपदार्थ करण्याची पंरपंरा आहे. यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही पारंपरिक खाद्यपदार्थ शेअर करत आहोत.

1. पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli With Katachi Amti)
-------------------------------------------------------------------------

     होळीचा सण पुरणपोळीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच होळीला होळी रे होळी पुरणाची पोळी असं गाणं म्हणण्याची पद्धत आहे. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक विशेष खाद्यपदार्थ आहे हो विविध सणांना  घरोघरी केला जातो. मात्र महाराष्ट्रात होळीला प्रत्येक घरात पुरणपोळी तयार केली जाते. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत पुरणपोळी तयार करण्याची कृती शेअर करत आहोत. महाराष्ट्रात विविध प्रकारे पुरळपोळी तयार केली जाते. ज्यामध्ये मैदा अथवा गहू, गुळ अथवा साखर, तूप याचा वापर केला जातो.

                 पुरळपोळी तयार करण्यासाठी साहित्य---

     एक कप हरबरा डाळ, एक किसलेला गुळ, एक कप मैदा आणि एक कप गव्हाचे पीठ, वेलची पूड

                      पुरणपोळी तयार करण्याची कृती---

     हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून त्यात किसलेला गुळ टाका आणि मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ते मिक्सर अथवा पुरणयंत्रात वाटून घ्या. चमचाभर तेल लावून सैलसर कणीक मळून घ्या. कणकेची पारी तयार करून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि अलगद पारीचे तोंड बंद करा. पोळी लाटून तूपावप खरपूस शेकवा. गरमागरम पोळी तूप, दुध आणि कटाच्या आमटीसोबत अगदी मस्त लागते.

                     कटाची आमटी करण्याची कृती---

     हि आमटी बर्‍याचदा पुरणपोळी केली जाते. त्यामुळे जर तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर चणाडाळ शिजवताना थोडे जास्त पाणी घालून डाळ शिजवून घ्या. पुरणासाठी पाणी वाडग्यात निथळून घेताना निथळलेले पाणी एक कप असेल तर त्यासोबत दीड कप शिजवलेली डाळ बाजूला काढा. जर तुम्ही पुरणपोळी करणार नसाल तर चणाडाळ कूकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्या. खोबर्‍याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्या. मसाले मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. शिजलेली चणाडाळ आणि पाणी व्यवस्थित घोटून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून मिश्रणाला चांगली फोडणी द्या. वरून गरजेनुसार पाणी घाला. आमटीला उकळी फुटली कि कुटलेला मसाला, गोडा मसाला चमचाभर त्यात घाला. मिश्रण ढवळून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. चवीपुरते मिठ टाका. वरून ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनीट मंद आचेवर उकळू द्या.


--तृप्ती पराडकर
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.