II होळी II-लेख क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:00:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                           लेख क्रमांक-6
                                          --------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता."फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

                          होळी सणाची माहिती---

                                प्रस्तावना :---

     भारत संस्कृती मध्ये अनेक उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात. त्या सणां पैकी बहुतेक जणांचा आवडीचा सण असतो तो म्हणजे " होळी ".

     होळी हा वसंत ऋतू मध्ये व मराठी वर्षाच्या अखेरीस म्हणजे फाल्गुन महिन्यात येतो. भारता मध्ये सर्वत्र होळी सण साजरा केला जातो तसेच होळी सणाला नेपाळी लोकांचा सण असेही म्हणतात. तरी आज आपण होळी या सणावर निबंध बघणार आहोत.

        होळी सण केव्हा साजरा केला जातो When Holi is celebrated ? :---

     मुख्यतः होळी हा सण रंगांचा सण आहे हा सण वसंत ऋतु मध्ये आणि मराठी वर्षाच्या अखेरीस मध्ये फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. इंग्रजी कालगणने नुसार हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

     हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणून होळी सणाला ओळखतात. सत्याचा असत्याचा विजय, वाईटावर चांगलेपणा विजय हे या सणाचे प्रतीक आहे. होळी हा २ ते ३ दिवसांचा सण आहे. होळी सणा दिवशी सगळे लोक वादविवाद, द्वेष, राग विसरून होलिका दहन साठी एकत्र येतात.

     होळी साठी लागणारी लाकडं, गावातील सर्व लोक मिळून जमा करतात. व सर्व स्त्रिया एकत्र येऊन नैवैद्य, पूजेची सर्व तयारी करतात. यावरून कळते ही होळी हा सण एक सण नसून समाजाला एकत्र करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. होळी च्या पहिल्या दिवशी " होलिका दहन " होते आणि दुसऱ्या दिवशी " रंगपंचमी " असते. कोणी या दिवसाला " रंगावली " असे सुद्धा म्हणतात.

         होळी सण हा साजरा करण्यामागील कारणे / पौराणिक कथा Reasons behind celebrating Holi / Mythology :---

     भारत संस्कृती मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात, ते सण साजरे करण्यामागे काही ना काही काल्पनिक कथा व कारणे असतात. तसेच होळी सण साजरा करण्यामागे ही पौराणिक कथा प्रचलित आहे. असे म्हणतात की,

     एक खूप मोठे राज्य होते आणि त्या राज्याच्या राजाचे नाव होते हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू राजा हा खूप घमंडी होता तो स्वतःला अतिशय ताकदवान समजत असे. स्वतःवर असलेल्या अति अहंकारामुळे तो स्वतःलाच देव समानी व देवतांची घृणा करत असे. त्यातला त्यात त्याला देव विष्णू चा अति राग असल्याने कोणी विष्णू चे नाव जरी घेतले तरी त्याला आवडत नसे.

     हिरण्यकश्यप राज्याला एक मुलगा होता त्याचे नाव होते प्रल्हाद. राजा आणि त्याच्या मुला मध्ये जरा ही साम्य नव्हते. हिरण्यकश्यपू राजा भगवान विष्णू चा राग करत तर प्रल्हाद हा भगवान विष्णू चा पर भक्त होतो. आणि आपला मुला विष्णूचा भक्त असल्याने राजाला आजीबात आवडत नसे.

     तो वेगवेगळ्या प्रकारे, प्रल्हाद ची भक्ती भंग करण्याचा प्रयत्न करी, कधी- कधी तर त्याला भीती सुद्धा दाखवत. पण प्रल्हाद ने न डगमगता भगवान विष्णूची उपासना सोडली नाही तो भगवान विष्णूच्या भक्ती तच लीन असे.

     काही केल्याने आपला मुलगा भगवान विष्णूची भक्ती सोडना याला कंटाळून राजा आपल्या बहिणीकडे गेला. राजाच्या बहिणीचे नाव होते होलिका. होलिकेला वरदान मिळाले होते की, ती अग्नीवर विजय प्राप्त करू शकेल. म्हणून राजाने होलिकेला भक्त प्रल्हाद ला घेऊन अग्नीच्या जळत्या चितेवर बसण्यास सांगितले.

     भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीतच लीन असल्याने तो होलिकेसोबत चीते वर बसले. आणि थोड्याच वेळात होलीका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान सांगितले होते की ज्यावेळी ती वरदानाचा गैरवापर करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.

     म्हणून ती अग्नीत जळून राख झाली पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत लीन असल्याने त्यांना काही झाले नाही. अशा प्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. व तेव्हा पासून लोकांनी होळी दहन हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली. आणि आजही आपण मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करतो.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉरमेशन एसे.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.