II रंगपंचमी II-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 07:50:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II रंगपंचमी II
                                           लेख क्रमांक-2
                                          ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

                            होळी सणाची माहिती---

     रंगपंचमी खेळताना रासायनिक रंगाचे दुष्परिणाम देखील दिसून येतात. म्हणून रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंदवन होतात. फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाणी, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, हळद पदार्थ पासून रंग तयार करण्याची प्रथा आपल्याला दिसून येते.

                     रंगपंचमी कशी साजरी करतात:---

     द्वारपाल युगात गोकुळात बालकुमार, कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यावर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. उन्हाची तलखी कमी करत असेल तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या स्वरूपाने चालू आहे. मध्ययुगात स्थानिक होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत होते. होळी, रंगपंचमी व धुलिवंदन या तिघांची मिळून होळी म्हटले जाते, ही आणखीन एक गंमतच आहे. वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते.

     फाल्गुन वैद्य पंचमीला तर रंग उडवण्याचा कार्यक्रम असतो. म्हणून ती रंगपंचमी असते, पण याला होळीच म्हटले जाते. होळी मुळात चालू कशी झाली याची पुराणात कथा आहे.

     मात्र होळी साजरी करण्याची प्रथा थोडी बदललेली दिसते. होळी साजरी करायची प्रथा नंतर गावागावात वाढली आणि त्यावरून जीवघेणी भांडणे होऊ लागली. दुसऱ्या गावातील लाकडी चोरून आणायची आणि त्यासाठी भांडाभांड करायची यामुळे होळी कलंकित झाली. होळीसाठी वर्गणी काढायची आणि ते पैसे मादक द्रव्य उडवायचे, होळी समोर बोंबा मारायच्या अचकट-विचकट चाळे करायचे अशा पद्धतीने हा सण साजरा होऊ लागला. यामुळे सुसंस्कृत लोकांना अशा सणांचे अप्रूप वाटेनासं झाले आहे.

               रंगपंचमी विषयी काही पौराणिक कथा:---

     रंगपंचमी विषयी काही पौराणिक कथा आपल्याला दिसून येतात. पुराण कथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते. त्यानंतर त्यांनी रंगरुपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हा देखील या उत्सवा मागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पूर्ण निवांत मान पुण्याच्या पद्धतीमध्ये होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे होळीनंतर नव्या वर्षाचा प्रारंभ होतो व त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सव असण्याची शक्यता आहे.

     जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून, आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे असे हे या आनंद उत्सवातून सूचित केले जाते. लग्नानंतर -च्या पहिल्या वर्षी सासुरवाडी कडून जावयाचे बारा सण साजरे होतात. त्यामध्ये रंगपंचमीचा अंतर्भाव आहे. त्या दिवशी नववधूला केशरी रंग उडविलेली नवी साडी सासरकडून मिळते.


--प्रमोद तपासे
--------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.