II रंगपंचमी II-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 07:51:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                          लेख क्रमांक-3
                                         ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

     मराठ्यांच्या कारकिर्दीत सरदार, प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असत असे शाहीर वर्णन वरून दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्षे वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर  रंग पडल्यामुळे त्यांचे पती पत्नीचे नाते सुचित होऊन पुढे त्यांचा विवाह झाला. अशी आख्यायिका शाहिरांनी केली आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी लाभ घेण्याची पद्धत आहे.

     तसेच रंगपंचमी विषयी आणखीन एक कथा प्रचलीत आहे, कि भगवान श्रीकृष्णाने मथुरा वृंदावन येथे गोपिकांचा रंगपंचमी खेळण्याचे प्रमाण आहे. त्यावरचे काव्य आणि चित्रे चांगलीच लोकप्रिय आहेत; पण आज रंगपंचमी तशी भावना राहिलेली नाही. रंगपंचमीच्या १५ दिवस आधीपासून पाण्याने भरलेले फुगे मुली आणि महिला यावर फेकले जातात.

     गाडीतून प्रवास करणाऱ्या कितीतरी प्रवाशांना याचा अनुभव आला आहे. यातून काही जन्माचे वैगुण्य आले आहे, त्या विरोधात दंड बनवली गेली, पण ते पुरेसे नाही. आजही सर्रास त्यांना फुगे मारण्याचा त्रास होताना दिसतो. ही एक प्रकारची विकृती म्हणावे लागेल. अगदी शाळेतच या गोष्टीला प्रारंभ करतांना दिसतो. महाविद्यालयीन मुले-मुली आणि झोपडपट्टीतले मुलं यामुळे रंगपंचमीचा रंग बिघडलेला आहे.

     तसेच होळी सुरु होण्यामागे पुराणात एक कथा आहे. हिरण्यकश्यपू या दैत्याला आपला मुलगा प्रल्हाद याचे नारायण वेड सहन झाले नाही आणि त्यांनी त्याला मारायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या बहिणीला पाचारण केले. तिचे नाव होलिका होते. ती क्रूर होती. प्रल्हादाला मारण्यासाठी होलीकेने एक अग्निकुंड प्रज्वलित केला आणि ती त्यात प्रल्हादाला ढकलायला लागली पण त्या प्रयत्नात ती जळाली त्या वेळी प्रल्हादाच्या पाठीराख्यांनी हर्ष व्यक्त केला.

     या होलीके वरून आणि या घटनेवरून होळी सण प्रारंभ झाला. हा सण म्हणजे सृष्टीचा दुष्टांवर विजय होय. आज ही कथा कल्पना जुन्या बुरसटलेल्या समजल्या जातात परंतु हेच वास्तविक आहे.


--प्रमोद तपासे
--------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.