II रंगपंचमी II-लेख क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:00:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II रंगपंचमी II
                                           लेख क्रमांक-8
                                         ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

                   रंगपंचमीची माहिती आणि महत्त्व---

     होळीला लागूनच येणारा सण म्हणजे रंगपंचमी. होळीनंतर म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण, आनंदाचा सण, उत्साहाचा सण. महाराष्ट्रात या सणाला धुलिवंदन अथवा धूळवड असंही म्हणतात. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून. पिचकारीने रंगाचे पाणी अंगावर उडवत आणि तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्याची पद्धत भारतात आहे. काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो. मोठ्यांना आदराने कपाळावर टिळा लावून आणि समवयस्क आणि लहानांसोबत रंगाची उधळण करत हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो. यासाठीच जाणून घ्या रंगपंचमी माहिती (Rangpanchami Information in Marathi) आणि हा सण नेमका कसा साजरा करावा. 
=========================================
                              Table of Contents

रंगपंचमी तिथी (Panchami Tithi)
रंगपंचमीचे महत्त्व (Significance Of Rang Panchami In Marathi)
रंगपंचमी कशी साजरी केली जाते (Celebrations And Rituals During Rang Panchami In Marathi)
सुरक्षित रंगपंचमी कशी साजरी करावी (How To Play Rang Panchami Safely)
=========================================

                  रंगपंचमी तिथी (Panchami Tithi)---

     रंगपंचमी होळी नंतर म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेनंत येणाऱ्या फाल्गुन कृष्ण पंचमीला असते. यंदा होळी नंतरचे सलग पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. रंगपंचमी खेळणं हे ऐश्वर्य, आनंदाचे प्रतिक असलेलं धनदायक मानले जातं. भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो.

        रंगपंचमीचे महत्त्व (Significance Of Rang Panchami)---

     रंगपंचमी हा सण होळी, धुलिवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जातो. काही ठिकाणी होळीनंतरचा दुसरा दिवस रंगपंचमी साजरी होते तर काही ठिकाणी होळीनंतरचे पाच दिवस धुळवडीचा आनंद लुटला जातो. या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात. या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने सांगण्यात येत असले. तरी रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जात असावा. कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात. झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते. त्यामुळे निसर्गातही रंगाची उधळण सुरू असते. याचं एक प्रतिक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी. शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागलेली असते. त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जात असावा. कारण रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचीही पद्धत आहे. असं म्हणतात द्वापारयुगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असतं. तिच प्रथा आजही रंगपंचमीच्या  रूपात पाळली जात आहे. हा सणाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना काही असल्या तरी या सणामुळे आजही नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. थोडक्यात सर्वांना एकत्र आणण्यासाठीच या सणाची निर्मिती केली गेली असावी. यासाठी जाणून घ्या होळी सणाची माहिती आणि होळी स्पेशल खाद्यपदार्थ.


--तृप्ती पराडकर
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.