II रंगपंचमी II-लेख क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:02:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            II रंगपंचमी II
                                            लेख क्रमांक-9
                                          ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

     रंगपंचमी कशी साजरी केली जाते (Celebrations And Rituals During Rang Panchami)---

     होळी अथवा रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे सर्वात आधी भक्तिपूर्वक राधा – कृष्ण आणि घरातील इतर देवतांना रंग लावला जातो. त्यानंतर घरातील मोठ्यांना रंग लावला जातो. लहान मंडळी मोठ्यांच्या कपाळावर रंगाचा टिळा लावून अथवा त्यांच्या चरणांवर रंगाचे पोट लावून या सणाला सुरूवात करतात. देवाची पूजा आणि घरातील मोठ्यांना आदरपूर्वक रंग लावल्यावर मग सर्वांसोबत रंगांची उधळण केली जाते. असं म्हणतात की या दिवशी मनापासून नामस्मरण केल्याने देव देवता स्वतः भक्ताला आर्शिवाद देण्यासाठी पृथ्वीवर रंग खेळण्यास येतात. कोरडे रंग, गुलाल, अबीर असे रंग उडवत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडत हा सण साजरा केला जातो. शिवाय या दिवशी घरात पुरणपोळी आणि गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रातील कोकण प्रांतात होळी ते रंगपंचमी दिवशी शिमगोत्सवही साजरा केला जातो. होळी नंतर काही दिवस गावोगावी ग्रामदेवतेचा पालखी आणि जत्रोत्सव या दिवसांमध्ये साजरा  केला जातो. घरो घरी येणाऱ्या पालखीचे दर्शन करण्यासाठी चाकरमानी या दिवसांमध्ये खास आपल्या कोकणातील घरी जातात. समा आणि शिमग्यातील पालखी नाचवताना पाहणे हे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.  त्यामुळे निरनिरळ्या ठिकाणी या सणाचे महत्त्व निरनिराळे आहे. रंगपंचमी खेळताना भगवान शिवशंकराला प्रिय असलेले भांग पिण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे थंडाई सारखे पदार्थही या दिवशी एकमेकांना दिले जातात. आजकाल या सणाचे स्वरूप काळानुरूप बदलत चालले आहे. त्यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी अथवा रंगपंचमीनिमित्त गेट-टुगेदर करत होळीच्या पार्टीचं आयोजन केलं जातं. या रंगपंचमी पार्टीजचे आयोजन मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. या निमित्ताने मग रंगपंचमी खेळण्यासाठी आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व जण एकत्र येतात. हा आनंद साजरा करताना प्रियजनांना द्या या होळीच्या शुभेच्छा संदेश

     सुरक्षित रंगपंचमी कशी साजरी करावी (How To Play Rang Panchami Safely)---

     होळीचा सण हा रंगाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. मात्र मागच्या वर्षभरापासून जगावर कोरोना नामक महामारीचे संकट घोंगावत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झालेला असला आणि  दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असलं तरी यंदा रंगपंचमी खेळताना सावध राहणं गरजेचं आहे. सोशल डिस्टसिंग पाळत कमी लोकांच्या उपस्थितीत रंगपंचमी खेळण्यास काहीच हरकत नाही. मात्र या काही गोष्टी प्रत्येकाने पाळायला हव्या. शिवाय अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच रंगपंचमी खेळण्याचा निर्णय घ्या.

रंगपंचमी खेळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
सुरक्षेसाठी केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगाचा वापर करा.

रंगपंचमी खेळताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या.

रंगपंचमी खेळण्यापूर्वी अंगाला नैसर्गिक तेल अथवा क्रिम लावा ज्यामुळे तुम्हाला रंगाची अॅलर्जी होणार नाही.

लहान मुलं, वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तीसोबत रंगपंचमी खेळू नका.

कोणलाही जबरदस्तीने रंग लावणे टाळा.

रंग खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा आणि केस स्कार्फने झाका.

ओलसर रंगपंचमी जागी खेळणार असाल तर तिथे खेळताना तुमचा पाय घसरला जाणार नाही याची काळजी घ्या.

स्विमिंग पूल अथवा तलावाजवळ रंगपंचमी खेळणे टाळा.

रंगपंचमी खेळण्यापूर्वी भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल.

जास्त काळ पाण्याने ओले झालेले कपडे अंगावर ठेवू नका.

रंगपंचमी थोड्या वेळासाठीच खेळा आणि नंतर लगेचच स्वच्छ अंघोळ करून केस आणि अंग कोरडे करा.

सर्दी, खोकला, शिंक येणे अथवा ताप असेल तर रंगपंचमी खेळणे टाळा.


--तृप्ती पराडकर
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.