II रंगपंचमी II-निबंध क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:05:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                         निबंध क्रमांक-2
                                        ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

                       रंगपंचमी वर निबंध---

      होळी हा रंगांचा उत्सव आहेत म्हणूनच या सणाला रंगपंचमी सुद्धा म्हटले जाते. हा सण मार्च महिन्यात साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी, वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. हा उत्सव खूप आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला लहान मुले पिचकारी विकत घेतात आणि रंगपंचमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

     रंगपंचमी हा होळीचा दुसरा दिवस असतो. या दिवसाला रंगाचा उत्सव देखील म्हटले जाते. रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण एकमेकाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावतात. लहान असो का मोठे या दिवशी सर्वत्र रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो. रंगपंचमी हा उत्सव महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साजरा करण्यात येणारा उत्सव आहेत.


--प्रमोद तपासे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                      ----------------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.