II रंगपंचमी II-शुभेच्छा आणि संदेश क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:14:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II रंगपंचमी II
                                शुभेच्छा आणि संदेश क्रमांक-1
                               ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

     "रगपंचमी मेसेज मराठी (Rang Panchami SMS)  वेगवेगळे रंग घेऊन येऊ दे तुमच्या आयुष्यात रंगपंचमी आनंद.. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! रंगात रंगून रंगले मी... तुझ्या आनंदात भिजले मी.. रंगपंचमीच्या शुभेच्छा!"

     रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश (Rang Panchami Quotes In Marathi)---

     होलिकेचे दहन करुन 'होळी' हा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे 'रंगपंचमी'. यालाच धुळवड असे देखील म्हणतात. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. रंगपंचमी सणाची माहिती आणि साजरा करण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकीच एक म्हणजे वातावरणातील बदल. साधारण मार्च महिना सुरु झाला की, अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. याशिवाय वातावरण बदलाचे स्वागत करण्यासाठी आणि येणाऱ्या नव्या पालवीसोबत आनंद व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो असे म्हणतात. होळी आणि रंगपंचमी या दिवसाला आपआपले महत्व आहे. रंगपंचमीचा हा सण अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही रंगपंचमीच्या शुभेच्छा संदेश, रंगपंचमी कोट्स (Rang Panchami Quotes In Marathi), रंगपंचमी एसएमएस (rang panchami sms in marathi), रंगपंचमी स्टेटस (rangpanchami status in marathi), रंगपंचमी मेसेज (rang panchami messages in marathi) यांची एक यादी केली आहे. या रंगपंचमी शुभेच्छा (Happy Rangpanchami In Marathi) आप्तेष्टांना पाठवून तुम्हाला हा दिवस साजरा करता येईल.

रंगात रंगूनी जाऊया,
सण रंगपंचमीचा आज साजरा करुया...
--Happy Rang Panchami 2022

रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही रंग वेगळे, रंगाचे महत्व अधोरेखित करतात
रंग रंगपंचमीचा, आनंदभऱ्या नव्या उत्सवाचा.. आला सण रंगाचा
रंग नात्याचा, रंग आनंदाचा
आला रंगाचा सण
साजरा करुया सण रंगपंचमीचा...
--Happy Rang Panchami 2022

--प्रेमाचा रंग उधळू दे,
आयुष्यामध्ये रंग येऊ दे
रंग आणो तुमच्या जीवनात आनंदाची लहर
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

सण रंगाचा घेऊन आला आनंद,
चला साजपा करुया हा आनंदोत्सव
रंगात रंगूनी साजरी करुया धुळवड..
आज आनंदाला नाही उरला पारावर...
--Happy Rang Panchami 2022

सण आला रंगाचा, प्रेमाचा आणि हर्षाचा..
--रंगपंचमीच्या शुभेच्छा

लाल, हिरवा, पिवळा, निळा..आला सण हा रंगाचा
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बुरा न मानो, होली है!
--होळीच्या शुभेच्छा


--लिनल गावडे
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.