II रंगपंचमी II-शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:21:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            II रंगपंचमी II
                                         शुभेच्छा  क्रमांक-2
                                       -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनI रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

Rang Panchami Marathi Shayari Wishes Messages Status SMS –

*****
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे...
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
*****
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला...
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण...
--रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
*****
"लाल" रंग तुमच्या गालांसाठी,
"काळा" रंग तुमच्या केसांसाठी,
"निळा" रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
"पिवळा" रंग तुमच्या हातांसाठी,
"गुलाबी" रंग तुमच्या होठांसाठी,
"सफेद" रंग तुमच्या मनासाठी,
"हिरवा" रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो...
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
*****
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात...
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वतःचा विसरूनी,
एकीचे महत्त्व सांगतात...
--रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****

--पंकज गोयल
-------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अजबगजब.कॉम)
                    ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.