II रंगपंचमी II-शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:22:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                       शुभेच्छा  क्रमांक-3
                                     -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनI रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बरच काही--

रंगात होळीच्या रंगूया चला
स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला...
रंग सारे मिसळूया चला
रंग रंगांचा विसरूया चला
सोडूनी भेद नी भाव
विसरूनी दु:खे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला...
--रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
जीवनाच्या वाटेवर,
पुन्हा मागे वळून पाहू,
सोडून गेल्या क्षणांना,
आठवणींत जपून ठेवू...
उरले सुरले क्षण जेवढे
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू...
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
रंगून जाऊ रंगात आता
होऊ स्वैर स्वच्छंद...
तोडून सारे बंध
आज उधळू आनंद...
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
बेभान मन
बेधुंद आसमंत
सर्वत्र आनंद
सारेच व्हा
होळीच्या रंगात दंग
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग...
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळुया आज हे रंग
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
पिचकारीतील पाणी,
अन् रंगांची गाणी...
रंगपंचमीच्या सणाची,
अशी अनोखी कहाणी...
विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा
लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा
--रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
*****
रंगात रंगले जीवन
हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांची रंगली
अशी काही शिंपण
हृदयी उरले प्रेम
अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण...
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****
रंगपंचमीला ती म्हणाली,
"कलर न लावता... असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे..."
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय... पार काळी-निळी करून टाकली...
*****
रंग न जाणती जात अन् भाषा
उधळण करूया, चढू दे प्रेमाची नशा...
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
*****

--पंकज गोयल
--------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अजबगजब.कॉम)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.