चंदन-शेती चारोळ्या-"शेतकऱ्यांच्या घामाचेचीज झालय,शेत चंदनसुगंधात न्हाऊन निघालंय"

Started by Atul Kaviraje, March 19, 2022, 01:37:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

         विषय : मराठवाड्यात  शेतकरी  करतोय  चंदनाची  शेती
                            चंदन -शेती  चारोळ्या
   "शेतकऱ्यांच्या घामाचे चीज झालय,शेत चंदन-सुगंधात न्हाऊन निघालंय"
  --------------------------------------------------------------


(1)
शेतकरी  शेतात  एक  अभिनव  उपक्रम  राबवतोय
जरा  हटके  म्हणून  तो  "चंदनाची"  शेती  करतोय
तेच  तेच  पीक  घेऊन , कंटाळलेले  होते  शेत ,
शेतकरी  आज  शेताला  सुगंधात  न्हाऊ  घालतोय .

(2)
बा  शेतकऱ्या , कर  तू  "चंदनाची"  शेती  बिनधास्त
पण  एवढाही  राहू  नकोस  तू  निर्धास्त
महाग  लाकूड  "चंदनाचे" , झाडे  जातील  चोरीला ,
महाराष्ट्रात  मराठी  वीरप्पनची  टोळी  तयार  होईल  "चंदन" -तस्करीला .

(3)
पण  आता  यापुढे  नाही  होणार  चोरी  "चंदन"  झाडांची
कारण  शेतकऱ्याने  प्रत्येक  झाडाच्या  ढोलीत  नाग  पाळलेत
"चंदन"  जेथे , साप  तेथे  , हा  वाक -प्रचार  अक्षरशः  खरा  ठरवून ,
शेतकऱ्यांनी  "चंदनाच्या"  झाडांना  रक्षण  दिलेय , अभय  दिलेय .

(4)
"चंदनाचा"  सुगंध  कधीही  लपत  नाही  म्हणतात
हा  हा  म्हणता  वाऱ्याने  तो  सुगंध  लांबवर  वाहून  नेलाय
आणि  पाहता -पाहता  नकाशावर  मराठवाड्याचे  नाव ,
"चंदन" -वाडा  म्हणून , सुगंधात ,सुवासात  झळकू  लागलेय .

(5)
शेतकऱ्याचे  दिवस  हळू -हळू  पालटू  लागलेत
तेव्हाचा  तो  बळी  जाणारा  बळीराजा , केव्हाच  नामशेष  झालाय
आजचा  शेतकरी  सधन ,श्रीमंत  म्हणून  वावरतोय  गावा -गावांत ,
"चंदनाच्या"  शेतीने  त्याला  हे  सुवासिक ,सुगंधित ,सुदिन  दाखवलेय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2022-शनिवार.