II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 04:43:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           लेख क्रमांक-2
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

     Shiv Jayanti 2022: 'दोन-दोन शिवजयंती यापुढे नको! जयंती 19 तारखेला जन्मतारखेनुसारच व्हावी', शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांना घालणार साकडं
Shiv Jayanti 2022: दोन-दोन शिवजयंती यापुढे नकोतच. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 तारखेला म्हणजेच जन्मतारखेनुसार असावी अशी मागणी खुद्द शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

     Shiv Jayanti 2022: 'No more two Shiv Jayanti!  birth anniversary should be on the 19th according to the date of birth ', Shiv Sena MLA demand to cm Shiv Jayanti 2022

     Shiv Jayanti 2022:  राज्यात यापुढे एकच शिवजयंती असावी, दोन-दोन शिवजयंती यापुढे नकोतच. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 तारखेला म्हणजेच जन्मतारखेनुसार असावी अशी मागणी खुद्द शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. त्यामुळे बुद्ध ठाकरे आपल्याच आमदारांची विनंती मान्य करणार आहेत का हा प्रश्न आहे.

     छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर युगपुरुष होते, शककर्ते होते. त्यांची तुलना इतर राष्ट्रीय नेत्यांशी होऊ शकत नाही. त्यांची जयंती पंचांगातील तिथीनुसार दरवर्षी फाल्गुन कृष्ण तृतीयेलाच साजरी होईल. तसा आदेश खुद्द शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना दिला. आणि शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तिथीनुसार साजरे करू लागले. पुढे कालांतरानं दोन- दोन शिवजयंतीचा वाद समोर आला पण बाळासाहेब ठाकरे यांनी माघार घेतली नाही. मात्र त्यांचेच सैनिक आता म्हणताय की महाराष्ट्रात एकच शिवजयंती हवी आणि ती तिथीनुसार नाहीतर तारखेनुसार व्हावी.

          दोन शिवजयंती साजरी करायला कधीपासून सुरुवात झाली?---

     शिवजयंतीच्या दोन तारखा आणि तिथी यांचा घोळ सोडवण्यासाठी पहिल्यांदा 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमली. कारण त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी होती. या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता. या मात्र या समितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करावी याबाबत एकवाक्यता झाली नाही.

     अखेर 2000 साली आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधिमंडळात उपलब्ध पुरावे आणि 1966च्या समितीचा अहवाल मांडून 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्म दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने मान्य केला. अशापद्धतीने शिवजयंतीचा शासकीय दिवस ठरला 19 फेब्रुवारी.

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन जयंती साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या मराठा संघटनांनी विरोध होत होता. एक राजा एक जयंती साजरी करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की शिवजयंती ही तिथी नुसार साजरी करावी.  आता शिवसेनेच्या आमदारांकडूनच तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला विरोध होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदारांचं ऐकणार की वडिलांच्या भूमिकेवर ठाम राहणार याचे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्राला मिळेल. मात्र आमदारांनीच थेट एकच शिवजयंतीची भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांची कोंडी केली आहे हे मात्र निश्चित.


--By: कृष्णा केंडे, गोविंद शेळके, एबीपी माझा
--Edited By: निलेश झालटे
-----------------------------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.abp लाईव्ह.कॉम)
               -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.