II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 04:45:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          लेख क्रमांक-3
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

     Shiv Jayanti 2022 Date: Shiv Jayanti exactly on which day 19th February or 6th April ..., Maharashtra Government announces guideline

     Shiv Jayanti 2022 Date: शिवजयंती नेमकी कोणत्या दिवशी 19 फेब्रुवारी की 6 एप्रिल..., महाराष्ट्र सरकारकडून गाईडलाईन

     Shiv Jayanti 2022 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती 19 फेब्रुवारीला साजरी होत आहे.

     Shiv Jayanti 2022 Date: Shiv Jayanti exactly on which day 19th February or 6th April ..., Maharashtra Government announces guideline Shiv Jayanti 2022 Date

     शिवजयंती नेमकी कोणत्या दिवशी 19 फेब्रुवारी की 6 एप्रिल..., महाराष्ट्र सरकारकडून गाईडलाईन जाहीर. छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती 19 फेब्रुवारीला साजरी होते,शिवजयंतीच्या निश्चित तारखेवरून राज्यात वाद आहेत.शिवाजी महाराजांचा नक्की जन्म कधी झाला, 19 फेब्रुवारी की 6 एप्रिल...हा वाद आहे,

     छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाते. पण महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांचा नक्की जन्म कधी झाला, 19 फेब्रुवारी की 6 एप्रिलला हा वाद आहे. पण महाराष्ट्र शासनाने विधीमंडळात तसा ठराव करुन शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करुन तसा ठराव  केला. तेव्हापासून राज्यभर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली आहे. यंदा शिवजयंती निमित्ताने राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केली आहे. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 'शिवज्योत दौड'मध्ये 200 आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थित राहता येतील. (Shiv Jayanti 2022 Date: Shiv Jayanti exactly on which day 19th February or 6th April ..., Maharashtra Government announces guideline)

     शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ला झाला असं मानलं जातं. महाराष्ट्र सरकारने 2000 साली विधिमंडळात तसा ठराव मांडून शासकीय कार्यक्रमांसाठी ही तारीख मंजूर करून घेतली. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार, शिवरायांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दिवशी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात पसरलेले शिवभक्त दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार, 19 फेब्रुवारी हा दिवस शिव जयंती म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य सरकार कडून देखील 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते.

                 पहिल्यांदा अशी साजरी झाली शिवजंयती---

     महाराष्ट्रामध्ये 1869 साली ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती महाराष्ट्रात साजरी केली. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तेव्हापासून शिव जयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर देशात स्वातंत्र लढा उभारताना पुन्हा शिवजयंती अधोरेखित झाली. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम सुरू केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे ते 2 वेळेस अध्यक्ष होते.

                      शिवनेरीवर शिवजन्मोत्सव---

     महाराष्ट्रात शिवजयंती निमित्त राज्यभर खास कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध स्पर्धा आयोजित करून शिवरायांच्या कामाला सलाम केला जातो. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा रितीनुसार साजरा करण्याची पद्धत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार कडून आयोजित केला जातो. त्यामध्ये सामान्य शिवप्रेमी देखील सहभागी होतात. या दिवशी पाळणा, पोवाडे गाऊन दिवसभर शिवजयंतीचं सेलिब्रेशन केले जाते. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.


--स्वप्निल शिंदे
-------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                 -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.