II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:33:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      शुभेच्छा  क्रमांक-1
                          -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

     शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 (Shiv Jayanti Status In Marathi) -Shivaji Maharaj Jayanti Status, Quotes In Marathi

     शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 (Shiv Jayanti Status In Marathi): छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

     आज आम्ही काही प्रसिद्ध शिवाजी महाराज सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्स,पोवाडे संग्रह इ. जे आपण आपल्या परिवार मित्रांसोबत Facebook, Instagram आणि Whatsapp वर शेयर करू शकता.

😠 ताशे तडफणार ...
ह्रदय❤ धडकणार ...
😎 मन थोडे भडकणार ......
पण या देशावरच 🇮🇳⚔काय ...
🌍अख्याजगावर🌎
" 19_फेब्रुवारी " ला "🚩भगवा🚩" झेंडा फडकणार ...🚩🚩🚩🚩
🚩 जयशिवराय🚩

रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया🚩🐅🚩🐆

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती...
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती...
जय शिवराय
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩

तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ...
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !

चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
🔥शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩

सिंहाची चाल ,गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
🚩जय भवानी जय शिवराय🚩


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.