II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II-चारोळी क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:09:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपति शिवाजी महाराज जयंती II
                                         चारोळी क्रमांक-2
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर काही चारोळी, कविता, शायरी इत्यादी--

ना शिवशंकर.. तो कैलाशपती,ना लंबोदर.. तो गणपती,
नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती !!

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
"राजा शिवछत्रपती"  मानाचा मुजरा

भूमीवर अधिपत्य गाजविणारे
अनेक भूपती या जगती जन्मले
परंतु करोडो हृदयावर अधिपत्य गाजवणारे
एकच शिवछत्रपती अवतरले..!!

छ- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र- त्रस्त मोगलांना करणारे,
प-परत न फिरणारे,
ति- तिन्ही जगात जाणणारे,
शि - शिस्तप्रिय,
वा-वाणिज तेज,
जी- जीजाऊंचे पुत्र,
म-महाराष्ट्राची शान,
हा- हार न मानणारे,
रा- राज्याचे हितचिंतक,
ज- जनतेचा राजा
--छत्रपती शिवाजी महाराज

इतिहासाच्या पानावर ज्याने नाव आपले कोरले
जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले

भगवा झेंडा हातात घेवूनी खींड त्याने लढवली
आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली
--छत्रपती शिवाजी महाराज

राजे तुम्ही होता म्हणुन
दिसले मंदिरांना कळश,
आणि दारात तुळस,
राजे तुम्ही होता म्हणुन
भरून राहिले सुहासिनींचे कपाळ
आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ
जय भवानी जय शिवाजी !!

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधीच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात!

स्त्रियांचा सन्मान करी
स्त्रियांचा राखी मान
जिजा माउलीने जन्म दिला
सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                   -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.