"०३-एप्रिल–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, April 03, 2022, 06:48:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   आज दिनांक-०३.०४.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "०३-एप्रिल–दिनविशेष"
                                    ---------------------

अ) ०३ एप्रिल रोजी झालेले घटना.
   --------------------------

१९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.

१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव्ह हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.

२०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

२०१६: पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उघड झाली

=========================================

ब) ०३ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८३०)

१८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९२८)

१८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६७)

१९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८)

१९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)

१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून २००८)

१९३०: जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.

१९३४: इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचा जन्म.

१९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.

१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.

१९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)

१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.

=========================================

क) ०३ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)

१९८१: पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक जुआन त्रिप्प यांचे निधन.(जन्म: २७ जून १८९९)

१९८५: महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १८९३)

१९९८: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९००)

१९९८: प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.

२०१२: भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.04.2022-रविवार.