१०-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 10, 2022, 07:29:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०४.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१०-एप्रिल–दिनविशेष"
                                     ---------------------


अ) १० एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.

=========================================

ब) १० एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१७५५: होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १८४३)

१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९०१)

१८४७: हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९११)

१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९४१)

१८९४: बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९८३)

१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९०)

१९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७१)

१९०७: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)

१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे २०१३)

१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)

१९३१: शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.

१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.

१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.

१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.

=========================================

क) १० एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.

१६७८: रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई यांचे निधन.

१८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १७३६)

१९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८८३)

१९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)

१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)

१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)

१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)

२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१८)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.04.2022-रविवार.