विनोदी मार्मिक चारोळ्या-डाव मेट्रोत रंगला जुगाराचा,तीन पत्तीचा अन मेंदीकोटचा

Started by Atul Kaviraje, April 13, 2022, 03:21:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        विषय : मेट्रोत जुगाराचा डाव
                           विनोदी मार्मिक चारोळ्या
        "डाव मेट्रोत रंगला जुगाराचा,तीन पत्तीचा अन मेंदीकोटचा"
                                 (भाग-2)
      ----------------------------------------------------


(६)
DESTINATION आले तरी नसतो "पत्ता"
गुंगलोय छक्कीवर टाकण्यात सत्ता
राजकारणही असंच असावं का ?
जो वरचढ त्यांचीच सत्ता !

(७)
"पत्ते" नाहीत तर मजा नसते
हलणाऱ्या डब्यात ती औरच असते
तोल सांभाळत, "पत्तेही" फेकायचे,
अंगी असलेले कौशल्य दाखवायचे.

(८)
अड्ड्यांवर आलीय बंदी कोरोनामुळे
"जुगारी" झालेत सगळेच पांगळे
नोकरी नाही, तरी वाऱ्या करताहेत,
"रेल्वेचा" डबा ते बुक करताहेत.

(९)
समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरतो
समाज माझी वाखाणणी करतो
पुन्हा एकदा डाव मांडण्यासाठी,
"रेल्वेचा" डबा मला खुणावतो.

(१०)
प्रवासी कंटाळलेत "जुगाऱ्यांना" सहून
त्यांच्या त्या "जुगाराला" राहून-राहून
"जुगारी" संघटनेच्या मागणीस मान देऊन,
"रेल्वेने" वेगळी बोगी त्यांना टाकलीय देऊन.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.04.2022-बुधवार.