अति तेथे माती

Started by Vijay_Matekar, April 21, 2022, 09:25:21 PM

Previous topic - Next topic

Vijay_Matekar

अति तेथे माती

खिडकी उघडी दार उघडे
मच्छर रूपी आले पाहुणे
भेटावयास घरामध्ये...

स्वागतासाठी उभा मी नव्हतो,
ओळख नव्हती या आधी कधी...

ओळख सांगण्यास गुणगुणू लागले,
अवती भवती ... काना भवती...

हात फिरवला दूर करण्या साठी,
तरीही घूम लागले मजजवळी....

लक्ष झाले विचलित आणि,
नजर राहिली स्थिर पाहुण्या वरी..

पाहताक्षणी आलें जवळी,
आदर केला अतिथी देव भव म्हणूनी...

पण त्याने चावा घेतला राक्षस बनूनी,
आता भरेल पोट त्याचे थांबलो म्हणूनी ...

भरले तुडुंब पोट त्याचे हटेना तरी,
अनावर झाला हात माझा त्याने केल्याने अति....

पाहताक्षणी वध झाला त्याचा माझ्या हातूनी,
अति तेथे होते माती मज आठवले त्यास पाहुणी....

विजय माटेकर लिखित