२५-एप्रिल–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 25, 2022, 04:40:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५.०४.२०२२-सोमवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "२५-एप्रिल–दिनविशेष"
                                    ----------------------


अ) २५ एप्रिल रोजी झालेल्या घटना.
   ----------------------------

१८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.

१९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

१९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.

१९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

१९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

१९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.

२०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.

२०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.

=========================================

ब) २५ एप्रिल रोजी झालेले जन्म.
  --------------------------

१२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)

१८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)

१९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)

१९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.

१९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.

१९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.

१९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

=========================================

क) २५ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.
   --------------------------

१९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.

२००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)

२००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)

२००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.04.2022-सोमवार.