१४-मे–दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 14, 2022, 12:33:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०५.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१४-मे–दिनविशेष"
                                    ------------------


अ) १४ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१७९६: इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.

१९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

१९६३: कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.

१९६५  चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

१९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

=========================================

ब) १४ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१६५७: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १६८९)

१९०७: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९७४)

१९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)

१९२३: दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म.

१९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९९)

१९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.

१९८४: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म.

१९९८: रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे २०१२)

=========================================

क) १४ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१६४३: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)

१९२३: कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८५५ – होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)

१९६३: भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: ३० डिसेंबर१९०२)

१९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१७)

१९९८: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९१५)

२०१२: रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन. (जन्म: १४ मे १९९८)

२०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९३९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.05.2022-शनिवार.