मागे वळून पहिले मी

Started by Sanjay Makone, May 16, 2022, 04:31:24 PM

Previous topic - Next topic

Sanjay Makone

शीर्षक - मागे वळून पहिले मी 
 
एकांत बैसलो पाहता ओसाड माळराना,
मन उबगले चालता रुतले काही मना.
मागे वळून पहिले मी बालपण हे तेव्हा,
जगावेसे वाटे मजला तसेच पुन्हा-पुन्हा.

करपून गेले आयुष्य या वाटेवरी आता,
भरकटत गेलो शोधता माझाच मी पत्ता.
जळत राहते संवेदना, जाणवल्या खुणा,
जगावेसे वाटे मजला तसेच पुन्हा-पुन्हा.

उभ्या आयुष्याच्या सामोरी जेव्हा कठीण वाटा,
सावरे तेथे वेचता जणू एक-एक काटा.
आठवे मग बालपणीचा खेळ तोच जुना,
जगावेसे वाटे मजला तसेच पुन्हा-पुन्हा.

अशक्य आहे असे सांगतो मीच माझ्या मना,
मनी खोल तरी जळत राहते संवेदना.
वाटते आजही करावा तोच बालिश गुन्हा,
जगावेसे वाटे मजला तसेच पुन्हा-पुन्हा.

         
         Sanjay Makone
         मु.अमळनेर ता.नेवासा,जि.अहमदनगर
         9623949907