वास्तव चारोळ्या-इमारतींची रांग डोंगरांनाही लाजवतेय,वर्षानुवर्षे ती ओसाडच राहतेय

Started by Atul Kaviraje, May 18, 2022, 12:21:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           विषय :नुकत्याच  बांधलेल्या  इमारतीचा  स्लॅब  कोसळला
                वास्तव ,नवीन  इमारतीची  दयनियता  चारोळ्या
     "इमारतींची रांग डोंगरांनाही लाजवतेय,वर्षानुवर्षे ती ओसाडच राहतेय"
    ------------------------------------------------------------
       

(1)
"इमारती"  उभ्या  राहताहेत , पटI -पटI , पाहता -पाहता
"स्लॅब"  कोसळताहेत  तिचे , काल -परवा -आज  आणि  आता
स्थापत्य -विशारदांचा  पगार  कमी  झालाय  की  काय  ?
या  इमारतीत  राहू  नका , टीप  देतोय  मी  तुम्हा , ही  चारोळी  लिहिता -लिहिता .

(2)
गेले  कित्येक  वर्षे  "इमारत"  उभीच  नव्हती  राहात
बांधली  की  कोसळायचा  धडामकन  तिचा  नवीन  "स्लॅब"
कोंबडे  कापले , बळी  दिले , मांत्रिकांकडून  तिला  कितींदा  पूजिले ,
सुरु  केलाय  आता  साऱ्या  कंत्राटदारांनी , महा -मृत्युंजयाचा  जाप .

(3)
नशीब  एव्हढेच  की  प्राणहानी  टळतेय , जीव  वाचतोय
निवास  होण्याआधीच  हे  "स्लॅब"  कोसळताहेत
भकास , उजाड  दिसताहेत  या  उघड्या   कोसळलेल्या  "इमारती" ,
आज  तिथे  चक्क  कोल्ही ,कुत्री ,रानडुकरे  मोकाट  फिरताहेत .

(4)
असं  वाटतंय , युद्धच  झालं  होत  इथे  केव्हातरी
एखाद्या  वॉर  चित्रपटातील  हे  दृश्यच   जणू
पण  त्याची  काही  युद्धाने  नाही  केलीय  राख -रांगोळी ,
कारणीभूत  आहेत  याला  सिमेंट ,रेती ,खडी  अन  दगडांच्या  भेसळी .

(5)
"इमारतीला"  सांगताही  येत  नाही , अन  सहनही  होत  नाही
"स्लॅबरूपी"  तिचा  कणा  आज  मोडून  पडत  आहे
तिचं  दुःख  तीच  जाणे , कोणालाही  होणार  नाही  याचे  आकलन ,
वर्षानुवर्षे  ती  मनुष्याच्या  पद -स्पर्शाची  वाट  पाहत  आहे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.05.2022-बुधवार.